आपला परिसर स्वच्छ ठेवला तर कोणीच आजारी पडणार नाहीं – डॉ. भागवत कराड
आपला परिसर स्वच्छ ठेवला तर कोणीच आजारी पडणार नाहीं – डॉ. भागवत कराड
एक दिवस एक तास स्वच्छता श्रमदान मोहिमेला उत्स्फृर्त प्रतिसाद
केंद्रीय संचार ब्यूरो व विविध संस्था मार्फ़त छत्रपती संभाजीनगर लेणी , डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात स्वच्छता श्रमदान अभियान अंतर्गत स्वच्छता करण्यात आली.
छत्वरपती संभाजीनगर, दि. 1.10.2023 (रविवार) – भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालय, केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर द्वारा भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, जिल्हा प्रशासन, महानगर पालिका, नेहरू युवा केंद्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, मौलाना आझाद महाविद्यालय, शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय, शासकीय विज्ञान संस्था, नेहरू युवा केंद्र, MTDC, विकास डेव्हलपर्स, छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर प्लोगर्स, मुक्तानंद महाविद्यालय, गंगापूर आदी संस्थांच्या सहकार्याने छत्रपती संभाजीनगर लेणी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात आज सकाळी 10 ते 11 यावेळेत “स्वच्छता ही सेवा” उपक्रमा अंर्तगत “एक दिवस एक तास श्रमदान” या उपक्रमा अंतर्गत स्वच्छता करून महात्मा गांधीना श्रधांजली देण्यासाठी स्वच्छता श्रमदान अभियान अंतर्गत स्वच्छता करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या “स्वच्छता ही सेवा” या अभियानांतर्गत रविवार 1 ऑक्टोंबर रोजी आयोजित या अभियानाला नागरीकांचा उत्स्फृर्त प्रतिसाद प्राप्त झाला असून या अभियानाला केवळ एका दिवसापुरते मर्यादीत न ठेवता जनआंदोलनाचे स्वरूप देऊन दररोज आपला परिसर करण्याचे आवाहन केंद्रीय राज्य अर्थमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केले व दररोज किमान 02 तास स्वच्छतेसाठी देऊन अपाला परिसर स्वच्छ राहिला तर कोणीच आजारी पडणार नाहीं असे प्रतिपादन केले.
या महास्वच्छता अभियानाला महाराष्ट्र राज्याच्या टुरिझम प्रिन्सिपल सेक्रेटरी, राधिका रस्तोगी, MTDC, मॅनेजिंग डायरेक्टर, श्रद्धा शर्मा, राज्य माहिती आयोगाचे उपसचिव, राजाराम सरोदे, प्री आयएस सेंटरच्या डॉ. पंकजा वाघमारे, शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या, रोहिणी पांढरे, केंद्रीय संचार ब्युरोचे प्रबंधक संतोष देशमुख, सहा. क्षेत्रीय प्रचार अधिकारी, प्रदीप पवार, नेहरू युवा केंद्राचे जिल्ल्हा युवा अधिकारी, शुक्ला, छत्रपती संभाजीनगर प्लोगर्स ग्रुपचे निखिल खंडेलवाल आदी उपस्थित होते.
यावेळी परिसर स्वच्छ झाल्यानंतर मौलाना आझाद महाविद्यालयाच्या एनसीसीच्या विद्यार्थ्यांने रैप सोंग सादर केले. शेवटी सर्वानी स्वच्छतेची शपथ घेतली व वृक्षारोपण करण्यात आल
(संतोष देशमुख)
प्रबंधक
केंद्रीय संचार ब्यूरो,
छत्रपती संभाजीनगर