धमकी देऊन दुचाकी गाडी पैसे व मोबाईल फोन चोरी करणावरावर कारवाई करा आशोक कुंभार यांची मागनी
पुणे : लोकशाही २४ न्युज चॅनलचे कार्यकारी संपादक व पांगारे तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथील रहिवासी श्री अशोक जगन्नाथ कुंभार वय ६५ व्यवसाय मुक्त पत्रकारीता , हे दि. २९ / ८ / २०२३ रोजी डॉ , बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन मालधक्का पुणे येथे, दुपारी १२ – ३० वाजे दरम्यान उभे असताना , त्यावेळी सदाशिव शिवराम नायर व त्याच्या सोबतचची महिला , पल्लवी संतोष वाडकर यांनी संगनमताने मला दमदाटी व जीवे मारण्याची धमकी देऊन, माझा मुलगा योगेश अशोक कुंभार, याच्या नावे असणारी मोटार सायकल क्रमांक एम एच १२ – ७३९१ ही माझ्या खिशातील मिडियाचा मोबाईल व रोख पाच हजार रुपये व या दोघांवर सासवड पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारींचे कागद घेऊन घेऊन, पलायन केले, (आशोक कुंभार यांचे म्हणणे आहे )
तदनंतर मी याबाबत बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यासाठी गेलो असता तेथील अधिकारी यांनी सदर ठिकाण आमच्या हद्दीत येत नाही , त्यामुळे तुम्ही ऑनलाईन तक्रार दाखल करा, मी घाबरलेल्या अवस्थेत असल्याने व मला ऑनलाईन तक्रार देता येत नसल्याने मी, दि ३१/ ८ / २०२३ रोजी इतरांच्या साह्याने ऑनलाईन तक्रार दाखल केली, त्यानंतर दि. ६ / ९ / २०२३ व त्या नंतर १२ / ९ / २०२३ रोजी बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे अर्ज दाखल झाले आहेत,
असे असताना व मी एक पत्रकार असताना देखील तक्रार दाखल करुन ,व आरोपींची नावे मोबाईल नं. देऊन देखील आजतागायत आरोपी मोकाट फिरत आहेत, त्यामुळे पोलीस प्रशासनाने याबाबत तात्काळ कारवाई करुन आरोपींना जेरबंद करुन माझी गाडी , मोबाईल फोन व रोख रक्कम मला मिळवून देण्यात यावी या बाबत मा. जिल्हाधिकारी साहेब पुणे जिल्हा, मा. पोलीस आयुक्त साहेब पुणे शहर, मा. पोलीस अधिक्षक साहेब पुणे ग्रामीण व मा. पोलीस निरीक्षक साहेब बंडगार्डन पोलीस स्टेशन यांच्या इतर ठिकाणी लेखी तक्रार देऊन , संबंधित आरोपींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी सदरील प्रसिद्धी पत्रकाद्वरे आशोक कुंभार यांनी केली आहे.