लोकसभेत दोन तृतीयांश मतांनी महिला आरक्षण विधेयक मंजूर
महिला आरक्षण विधेयकावर आज संसदेच्या विशेष अधिवेशनात चर्चा करण्यात येत आहे. या विधेयकावर बोलताना काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी ‘महिला या विधेयकाची मागील 13 वर्षापासून वाट पाहत आहेत’ असं, स्पष्ट केलं.
महिला आरक्षण विधेयकावर लोकसभेत मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यावेळी खासदार हे मतपत्रिकेच्या माध्यमातून मतदान होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित आहेत. आरक्षण विधेयकाला विरोधकांनीही पाठिंबा दर्शविलाय.
#WATCH | Lok Sabha MPs vote on Women’s Reservation Bill pic.twitter.com/ZngFNhesc5
— ANI (@ANI) September 20, 2023
आरक्षणाच्या बाजूनं 454 मते पडली आहेत. त्यामुळे दोन तृतीयांश मतांनी महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. त्यामुळे महिला आरक्षण विधेयकाच कायद्यात रुपांतरण झालं आहे. 2 मते आरक्षणाच्या विरोधात पडली आहेत.
राहुल गांधी म्हणाले, एक मोठा घटक आरक्षणापासून वंचित आहे. या प्रक्रियेच्यावेळी राष्ट्रपतींनी सभागृहात असणं गरजेच होतं. महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा आहे. नव्या संसदेत बोलण्याची संधी मिळाली आहे. नव्या संसदेत बोलताना आनंद होत असल्याचे काँग्रसेचे खासदार राहुल गांधी यांनी म्हटलं. महिला आरक्षण विधेयक हा देशासाठी महत्त्वाचा निर्णय आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला आरक्षणाचं मोठा पाऊल होते. हे विधेयक आजपासून लागू व्हावे, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.
Congress MP Rahul Gandhi speaks in debate on Women's Reservation Bill in Lok Sabha pic.twitter.com/crAjQgt4zq
— ANI (@ANI) September 20, 2023
तुमचे शब्द कागद व भाषणापर्यंत मर्यादित न ठेवता कृतीने व्यक्त व्हा. नारी शक्ती वंदन विधेयकाला पाठिंबा द्या, असे आवाहन केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी महिला आरक्षण विधेयकावर लोकसभेत केले. महिला आरक्षण विधेयकावर आज संसदेच्या विशेष अधिवेशनात चर्चा करण्यात येणार आहे. महिला आरक्षण विधेयकावर आज काँग्रेस नेत्या सोनिया गांधी ( Sonia Gandhi ) या बोलणार असल्याची माहिती काँग्रेसच्या वतीनं देण्यात आली आहे. विशेष म्हणजे महिला आरक्षण विधेयकावरुन आता श्रेय लाटण्याची चढाओढ लागली आहे.
नवीन संसदेच्या इमारतीत सत्ताधाऱ्यांनी मांडलं विधेयक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकालात संसदेची नवीन इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीत स्थलांतर केल्यानंतर पहिल्याच दिवशी नरेंद्र मोदी सरकारनं महिला आरक्षण विधेयक मांडलं आहे. त्यामुळे विरोधकांनी सरकारवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. सरकारनं आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मांडल्याचा आरोप कपील सिब्बल यांनी मंगळवारी केला होता
सोनिया गांधी म्हणाल्या हे तर आमचं विधेयक : पहिल्यांदा महिलांना स्थानिक निवडणुकींमध्ये महिलांना आरक्षण मिळणार आहे. दिवंगत राजीव गांधी यांनी पहिल्यांदा हे विधेयक संसदेत मांडलं होतं. त्यामुळे हा माझ्या आयुष्यातील खूप मोठा भावनिक क्षण आहे. राजीव गांधी यांचं अर्ध स्वप्न आज सत्यात उतरलं आहे. हे विधेयक पारित झाल्यानंतर राजीव गांधी यांचं स्वप्न पूर्ण होणार आहे. काँग्रेसकडं देशभरात मोठ्या प्रमाणात महिला नेत्या आहेत. त्यांना महिला आरक्षण विधेयकाचा लाभ होणार आहे, असं काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी संसदेत बोलताना स्पष्ट केलं.
भाजपाची काँग्रेसवर टीका : महिला आरक्षण विधेयक ही काँग्रेस पक्षाची मागणी असल्याचा दावा काँग्रेस नेत्यांनी केला आहे. त्यामुळे महिला आरक्षण विधेयकावरुन चांगलचं राजकारण रंगलं आहे. या महिला आरक्षण विधेयकाचं श्रेय घेण्याची चढाओढ विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये सुरु आहे. आज काँग्रेसनं महिला आरक्षण विधेयकावर हक्क सांगितल्यानंतर भाजपाकडून चांगलीच टीका करण्यात आली. भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभेत काँग्रेस विरोधात चांगलाच हल्लाबोल केला. निशिकांत दुबे बोलण्यास उभे राहिल्यानंतर विरोधकांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे निशिकांत दुबे यांनी काँग्रेस श्रेय लाटण्यासाठी चढाओढ करत असल्याचं सदनात स्पष्ट केलं.