राजकीय

लोकसभा निवडणुकीत भाजपला किती जागा मिळतील? प्रसिद्ध अर्थतज्त्रांनी केलं भाकित


प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ आणि राजकीय विश्लेषक सुरजित भल्ला यांनी येत्या लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाबाबत भाकित केलं आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपेक्षा २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप अधिक यश मिळवेल असं ते म्हणाले आहेत.



एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा अंदाज व्यक्त केला. (Surjit Bhalla economistpm Narendra Modi bjp winning 330 to 350 seats in the ongoing general elections knp94)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पक्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ३३० ते ३५० पर्यंत जागा मिळवेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. सुरजित भल्ला यांचे ‘हाऊ वुई वोट’ ‘How We Vote’ हे पुस्तक प्रकाशित झालं आहे. मतदार मतदान करताना कोणत्या गोष्टींचा विचार करतात, त्यांची मानसिकता कशी असते याबाबत हे पुस्तक आहे.

सांख्यिकी माहितीच्या आधारावर भाजपला ३३० ते ३५० जागा मिळण्याची शक्यता आहे. या जागा फक्त भाजपच्या आहेत, राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजे एनडीएला यापेक्षा जास्त जागा मिळतील असं भल्ला म्हणाले आहेत. २०१९ च्या तुलनेत २०२४ च्या निवडणुकीत भाजपच्या जागांमध्ये ५ ते ७ टक्क्यांनी वाढ होईल असा दावा देखील त्यांनी केला आहे.

सुरजित भल्ला यांनी काँग्रेसच्या जागांबाबत देखील भाकित केलं आहे. काँग्रेसला ४४ जागा मिळतील. २०१९ च्या तुलनेत २०२४ मध्ये काँग्रेसच्या जागा २ टक्क्यांनी कमी होतील असा दावा त्यांनी केला आहे. विरोधकांकडे चेहरा नसणे ही त्यांची मोठी समस्या आहे, असं ते म्हणाले.

अर्थव्यवस्था सर्वात जास्त महत्त्वाची ठरते, त्यानंतर नेतृत्त्वाचा प्रश्न येतो. सध्या अर्थव्यवस्था आणि नेतृत्व दोन्ही भाजपच्या बाजूने आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तुलनेत किमान ५० टक्के मान्यतेचा, पण ज्याला लोक चांगली पसंती देतील अशा उमेदवाराला काँग्रेसने समोर आणलं तर निवडणुकीत काहीशी लढत होऊ शकते. अन्यता ही लढत एकतर्फीच असेल असंही ते म्हणाले आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button