अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा रद्द; ‘हे’ सांगितले कारण
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) महराष्ट्रा दौऱ्यावर येणार होते. 17 सप्टेंबरला ते छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे भेट देणार होते. मात्र आता त्यांचा हा दौरा रद्द झाल्याची माहिती समोर येत आहे.
17 सप्टेंबर रोजी शहा यांच्या वेळेचे नियोजन होत नसल्याचे कारण देत हा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती स्थानिक भाजप नेत्यांकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, गृहमंत्री अमित शहा हे 17 सप्टेंबर रोजी औरंगाबाद दौऱ्यावर येणार असल्याची माहिती गेल्या आठवड्यात स्थानिक भाजप नेत्यांकडून देण्यात आली आहे. या बाबत शहा यांचा दौरा देखील आल्याचा दावा भाजप नेत्यांकडून करण्यात आला होता. तर, या दौऱ्यात अमित शहा हे मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. सोबतच त्यांची सभा घेण्याची देखील नियोजन भाजपकडून सुरु असल्याची माहिती भाजप नेत्यांकडून माध्यमांना देण्यात आली होती.
मराठवाडा मुक्तिसंग्रामचं यंदा अमृत महोत्सवी वर्ष असल्याने यानिमित्ताने प्रशासनाकडून वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांना मुख्यंमत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री अजित पवारांसह अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत. अमित शहा यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने भाजप नेत्यांकडून जोरदार तयारी करण्यात आली होती. विशेष म्हणजे अमित शहा यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने भाजपकडून शहरात जोरदार शक्तिप्रदर्शन देखील केली जाण्याची शक्यता होती.