ताज्या बातम्या

“बढाया मारणं बास झालं, आता…”, अनंतनाग चकमकीच्या घटनेवरून फारुख अब्दुल्ला संतापले


नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी अनंतनाग चकमकीवर वक्तव्य केले आहे. या चकमकीत देशातील तीन लष्करी अधिकारी शहीद झाल्याबद्दल प्रतिक्रिया देताना माजी मुख्यमंत्री म्हणाले की, भारत आणि पाकिस्तानने अहंकार बाजूला ठेवून चर्चा करावी. फारुख अब्दुल्ला म्हणाले की, सरकार दररोज दहशतवाद संपल्याचे श्रेय घेत असते.

आता सांगा, दहशतवाद संपला आहे का? जोपर्यंत शांतता आणू शकेल असा मार्ग सापडत नाही, तोपर्यंत हे प्रकार संपणार नाहीत. त्यामुळे बढाया मारणं थांबवा आणि एकमेकांशी चर्चा करून मार्ग काढा, असे त्यांनी सुचवले.

“संघर्षाने शांतता येत नाही. संवादातून शांतता येते. युद्धामुळे युक्रेनची काय स्थिती आहे ते तुम्ही पाहू शकता. युक्रेन सध्या उद्ध्वस्त आहे आणि कुठेही बाहेर पडण्याचा मार्ग नाही. रशिया आणि युक्रेनला चर्चा करून हे प्रकरण सोडवावे लागेल. तसेच भारत आणि पाकिस्तानलाही चर्चा करावी लागेल. दोन्ही देशांनी अहंकार सोडून टेबलावर बसून चर्चा करणे गरजेचे आहे”, असा सल्ला अब्दुल्ला यांनी दिला.

अनंतनागच्या कोकोरेनाग भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. मंगळवारी रात्री दहशतवादी लपल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर लष्कर आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई सुरू केली. कर्नल मनप्रीत सिंग या संघाचे नेतृत्व करत होते. सुरक्षा दल उंचीवर उपस्थित दहशतवाद्यांच्या दिशेने सरकले. लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. कर्नल मनप्रीत, मेजर आशिष, डीएसपी हुमायून दहशतवाद्यांच्या गोळ्यांनी जखमी झाले. त्याला घाईघाईने एअरलिफ्ट करण्यात आले. तिघांना वाचवता आले नाही.

टीआरएफ या दहशतवादी संघटनेने सुरक्षा दलावरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यानंतर अनंतनागमध्ये सुरक्षा दलांचे दहशतवादविरोधी अभियान सुरू आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button