ताज्या बातम्या

वाहन चोरी करणाऱ्या सराईत आरोपीकडून १७ गुन्ह्यांची उकल


चावीच्या दुकानात डुप्लीकेट चावी बनविण्याचा हँड व्हाईस चोरी करून त्याच्यापासून चाव्या बनवत वाहने चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने अटक केली आहे.

विशेष म्हणजे चोरी केलेल्या चार चाकी वाहनाच्या अपघातामुळे आरोपी पकडला गेला आहे. पोलिसांनी आरोपीकडून १७ गुन्ह्यांची उकल करून चोरी केलेले लाखो रुपयांचे वाहनेही जप्त करण्यात आल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी दिली आहे.

न्यू लिंक रोड फायर ब्रिगेड जवळ राहणारे दीपक मदनलाल शाह (४५) यांचा मोटर ड्रायव्हिंग स्कूलचा व्यवसाय आहे. त्यांची दीड लाख रुपये किमतीची कार ३१ ऑगस्टला रात्री नेमिनाथ नगर आचोळे रोड येथे रस्त्याच्या कडेला पार्क करून ठेवली असताना चोरट्यांनी ती चोरी करून नेली होती. याप्रकरणी आचोळे पोलिसांनी वाहन चोरीचा गुन्हा दाखल केला होता. पोलीस आयुक्तालयाचे हद्दिमध्ये सतत होणा-या वाहन चोरींचे प्रमाण वाढत असल्याने वाहन चोऱ्यांवर आळा घालणेबाबत वरीष्ठांनी ओदशित केले होते. त्या अनुषंगाने घडणा-या प्रत्येक वाहन चोरीच्या गुन्हयाचे ठिकाणी प्रत्यक्ष भेट देवून घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजचे परीक्षण गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पथक यांचे मार्फतीने करण्यात येत होते.

आचोळ्यातील चोरीला गेलेल्या व्हॅग्नार कारचे सीसीटीव्ही फुटेज माग काढत असताना ती कार श्रीराम नगर या ठिकाणी अपघातग्रस्त अवस्थेत सापडली. अपघातग्रस्त वाहनाचे चालका बाबत आजूबाजूला तपास केल्यावर आरोपीच्या कपाळास दुखापत झाल्याची माहीती मिळाली. जखमी आरोपी हा उपचाराकरीता अपघाताचे परिसरात जाण्याची शक्यता असल्याने रुग्णालयात तपास करताना त्याने धानिवबागच्या साई हॉस्पिटल येथे दवाउपचार घेतल्याची माहीती मिळाली. गुन्हे शाखेने सापळा रचुन शादाब उर्फ बाबा उर्फ तावडे नौशाद शेख (२३) याला ताब्यात घेतले. त्याचेकडे तपास केल्यावर सदर गुन्हाचा सहभाग निष्पन्न झाल्याने अटक केली. आरोपीकडे अधिक तपास केल्यावर आयुक्तालयातील वाहन चोरीचे ११, घरफोडीचा १, मोबाईल चोरीचा १ इतर चोरीचा १ असे एकुण १४ गुन्हे व मुंबई पोलीस आयुक्तालयातील ३ गुन्हे उघडकीस आले आहेत. अटक आरोपीकडून उघडकीस आणलेल्या १७ गुन्हयात १२ दुचाकी, २ चार चाकी, ४ मोबाईल व १ डुप्लीकेट चावी बनविण्याचा हँड व्हाईस व चाव्यांचा गुच्छा असा ५ लाख ९४ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अटक आरोपी विरुध्द विनोबा भावे नगर पोलीस ठाणे येथे एकुण ७ गुन्हे दाखल आहेत.

सदरची कारवाई पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल मांडवे यांचे मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक शाहुराज रणवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे, सागर शिंदे, सहाय्यक फौजदार संजय नवले, रमेश भोसले, पोलीस हवालदार प्रफुल्ल पाटील, चंदन मोरे, सचिन पाटील, जगदीश गोवारी, रमेश आलदर, सुधीर नरळे, दादा आडके, प्रशांतकुमार ठाकुर, अमोल कोरे, सायबर शाखेचे संतोष चव्हाण, म.सु.ब. अविनाश चौधरी, रामेश्वर केकान यांनी केली आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button