Video :बीड मराठा आरक्षणावरून ओबीसी समाज आक्रमक
ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या, या मागणीसाठी बीडमध्ये ओबीसी संघटना आक्रमक झाल्या आहेत. तसेच सोलापूर -धुळे राष्ट्रीय महामार्गावर बीड शहराजवळ महालक्ष्मी चौकात अर्धा तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
अगोदरच ओबीसीमध्ये चारशे जाती आहेत आणि आरक्षण १७ टक्के आहे. त्यामुळे मराठा समाज जर ओबीसीमध्ये आला तर आरक्षण वाटता येणार नाही. त्यामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या. अशी मागणी समता परिषदेसह इतर ओबीसी संघटनांनी केली आहे.
बीड ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी भव्य रस्ता रोको आंदोलन pic.twitter.com/leYtCIDB4n
— NAVGAN NEWS BEED (@beed_news) September 12, 2023
सरकारने दबावाखाली येऊन ओबीसीमधून आरक्षण दिले तर ओबीसी समाज देखील आक्रमक होईल, त्याचा परिणाम सरकारला भोगावा लागेल, असा इशाराही ओबीसी संघटनांनी दिला आहे.