
पुणे : भाजप आमदार नितेश राणे यांनी पुण्यामध्ये एक वादग्रस्त विधान केलंय. पुण्यातील पुण्येश्वर मंदिरातील अतिक्रमणाविरोधात भाजप नेते आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार महेश लांडगे यांनी महापालिका प्रशासनाला ४८ तासांमध्ये अतिक्रमण हटविण्याचा अल्टीमेटम दिला आहे. यावेळी आमदार नितेश राणे देखील उपस्थित होते. त्यावेळी आमदार राणे यांनी हे वादग्रस्त विधान केले. सर्वधर्मसमभावाचा ठेका फक्त हिंदूंनी घेतला नाही. हे हिंदूराष्ट्र आहे त्यामुळे आधी हिंदूचे हित बघितले जाईल मग इतरांना बघितले जाईल असा इशारा त्यांनी दिला. आपण घोडा हत्याराची भाषा करणार नाही आम्ही थेट कापतो, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे.