ताज्या बातम्या
पोलिसांचा अमानुष लाठी चार्ज सदर घटनेचा बीड जिल्हा वकील संघाकडून जाहीर निषेध
बीड जिल्हा वकील संघ तर्फे मराठा आरक्षणा संदर्भात सराटे अंतरवली तालुका अंबड येथील चालू असलेला लढा चीरडण्यासाठी पोलिसांनी अमानुष लाठी चार्ज केला सदर घटनेचा बीड जिल्हा वकील संघाने जाहीर निषेध करून सकाळी 10.30 सर्व वकील बांधव एकात्रित छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या पासून पायी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाऊन मा. जिल्हाधिकारी व मुख्यमंत्री यांना निवेदन दिले. प्रसंगी बीड जिल्हा वकील संघाचे सचिव ॲड. एकनाथ काकडे,ॲड. बप्पा आवटे, ॲड. जगताप साहेब, ॲड. साबळे साहेब, ॲड. एल.एम काकडे साहेब, ॲड. विनायक जाधव ॲड. राजेश जाधव, ॲड. सतीश गाडे, ॲड. सागर नाईकवाडे ॲड. विवेक डोके. ॲड. गायकवाड साहेब व बीड जिल्हा वकील संघातील सर्व सन्माननीय सदस्य मोठ्या प्रमाणात निवेदन देण्यासाठी सहभागी झाले होते.