हाफिज शाहिदने केला शिक्षिकेवर बलात्कार; व्हिडिओ काढून करत होता ब्लॅकमेल!
उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यात पोलिसांनी एका मौलानाला सरकारी शाळेतील शिक्षकेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. हाफिज शाहिद असे आरोपीचे नाव आहे. पीडितेच्या पतीवर उपचार करण्याच्या बहाण्याने मौलानाने शिक्षिकेवर केवळ बलात्कारच केला नाही तर तिचा अश्लिल व्हिडिओही बनवला, असा आरोप आहे.
व्हिडिओ दाखवून हाफिज शाहिद महिला शिक्षिकेला ब्लॅकमेल करून लाखो रुपये उकळत होता. त्यानंतर दि. ३१ ऑगस्ट रोजी मौलानाला अटक करण्यात आली आहे.
मेरठ के इंचौली थाना क्षेत्र में शिक्षिका के साथ इमाम ने दुष्कर्म कर वीडियो बनाई। उसके बाद वायरल करने की धमकी देकर दस साल में एक करोड़ की रकम ठग ली गई। इमाम के खिलाफ दुष्कर्म और ब्लैकमेल करने का मुकदमा दर्ज कर गिरफ्तार कर लिया गया। इंचौली क्षेत्र की रहने वाली 56 वर्षीय महिला शहर…
— Suryakant (@suryakantvsnl) August 31, 2023
ही घटना मेरठमधील इंचोली पोलीस स्टेशन परिसरात घडली. येथील एका सरकारी शाळेतील ५६ वर्षीय शिक्षिकेने मौलाना हाफिज शाहिदविरोधात तक्रार दाखल केली होती. तक्रारीत म्हटले आहे की, १० वर्षांपूर्वी पीडित मुलगी मदरशात शिक्षिका म्हणून मुलांना शिकवायची. यादरम्यान तिची तेथे शिकवणाऱ्या मौलाना हाफिज शाहिद यांच्याशी ओळख झाली.महिलेच्या पतीची तब्येत अनेकदा खराब असायची. त्यामुळे तिने मौलाना हाफिज शाहिदचा सल्ला घेतला. हाफिज शाहिदने महिला शिक्षिकेच्या पतीवर भूतबाधा झाल्याचे सांगितले.
काही वेळाने मौलाना महिलेच्या घरी जाऊ लागला आणि भूत काढण्याच्या बहाण्याने तिच्यावर बलात्कार केला. यावेळी त्याने गुपचूप एक व्हिडिओही बनवला. नंतर तोच व्हिडिओ व्हायरल करण्याची भीती दाखवून आरोपींने पीडितेकडून सुमारे सात लाख रुपये उकळले. आरोपी शिक्षिकेकडून एक कोटी रुपये उकळण्याचा प्रयत्न केल्याचा दावाही केला जात आहे.
तक्रारीत पीडितेने पुढे म्हटले आहे की, २३ ऑगस्ट रोजी हाफिज शाहिदने पुन्हा एकदा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्याने पीडितेला बोलावून तिच्यावर पुन्हा बलात्कार केला. अखेर महिला शिक्षिकेने आरोपीविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी मौलाना हाफिज शाहिदविरुद्ध आयपीसीच्या कलम ३२३, ३२८, ३७६ आणि ५०६ अंतर्गत एफआयआर नोंदवून आरोपींचा शोध सुरू केला. अखेर ३१ ऑगस्ट रोजी आरोपी मौलानाला अटक करण्यात आली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.