ताज्या बातम्याबीड

शरद पवारांनी बीड जिल्ह्याला काय दिलं? धनंजय मुंडेंचा सवाल


शरद पवारांनी सांगितलं की ‘बीड जिल्ह्याने शरद पवारांवर खूप प्रेम केलं.’ मात्र, प्रेमापोटी शरद पवारांनी बीड जिल्ह्याला काय दिलं? असा धनंजय मुंडे यांनी शरद पवारांना केला आहे.
बीडमध्ये जाहीर सभेत बोलत होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची रविवारी बीडमध्ये जाहीर सभा झाली. या सभेत बोलताना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर थेट हल्लाबोल केला. 17 ऑगस्टच्या सभेत शरद पवारांनी सांगितलं की ‘बीड जिल्ह्याने शरद पवारांवर खूप प्रेम केलं.’ मात्र, प्रेमापोटी शरद पवारांनी बीड जिल्ह्याला काय दिलं? असा सवाल धनंजय मुंडे यांनी शरद पवारांना केला आहे.

शरद पवारांनी काय दिलं? पुढे बोलतांना धनंजय मुंडे म्हणाले की, मला अनेकांनी विचारलं होतं की, तुमची सभा शरद पवारांच्या सभेला उत्तर देण्यासाठी होणरा आहे का? मी नम्रपणे कार्यकर्त्यांना जनतेला सांगितलं, की ही सभा ‘उत्तरे’ देण्यासाठी नाही तर, बीडच्या जनतेची सेवा करण्यासाठी आहे. शरद पवारां सांगतात बीडने खूप प्रेम दिलं, मात्र, विकासाच्या दृष्टीने अजित पवारांनी ‘जबाबदारी’ दिली. त्यामुळे ही सभा उत्तरदायीत्वाची सभा असल्याचं मुंडे म्हणाले. ही सभा बीडच्या विकासासाठी आहे. बीडचा दुष्काळ कायमचा संपवण्यासाठी ही सभा आहे. बीड जिल्ह्याच्या खूप अपेक्षा आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक अपेक्षा पूर्ण केल्या आहेत असं कौतुक मुंडे यांनी केलं

पवारांकडून संघर्ष शिकलो : मी शरद पवारांडून संघर्ष शिकलो. प्रश्न कसे सोडवायचे हा माझा इतिहास आहे. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर मी भाजपच्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. 2014 मध्ये अजित पवारांशिवाय कुणालाही विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी दिली असेल, असे वाटत नाही. 2014 ते 2019 या काळात मी सर्वात मोठा संघर्ष केला. असं शरद पवार यांनी सांगितलं. हा माझा इतिहास आहे, असं धनंजय मुंडे म्हणाले. शरद पवार यांनी विधान परिषदेतील कामगिरीचे कौतुक केलं, पवारांच्या पुस्तकात माझा इतिहास आहे. मी 2019 चा इतिहास सांगणार नाही, कारण मला लवकर उठण्याची सवय नाही.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button