वाढदिवसाचा केक न स्वीकारल्याने तरुणाची तरुणीला मारहाण
पुणे:एकतर्फी प्रेमातून वाढदिवसानिमित्त तरुणीला कुरिअरने केक पाठवला. पण तिने तो केक स्विकारला नाही. त्यामुळे ( Pune) त्या तरुणाने तरुणीला घरात घुसून मारहाण केल्याची घटना पुण्यातील कोंढवा परिसरात घडली आहे.
अंकित सिंग ( ,वय 31, रा.केशवनगर) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अंकित सिंग आणि पीडित तरुणीची मे 2022 पासून मैत्री होती.आरोपी अंकित हा तरुणी सोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत असल्याचे लक्षात येताच,पीडित तरुणींने अंकित सिंगचा मोबाईल नंबर ब्लॉक केला त्यानंतर वेगवेगळ्या मार्गाने तो तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत होता.
त्याच दरम्यान पीडित तरुणीचा 24 ऑगस्ट रोजी वाढदिवस होता. त्यामुळे आरोपी अंकित सिंग याने कुरिअरने केक पाठवला. मात्र सोसायटीमधील सुरक्षारक्षकाने कुरिअर बॉयला आतमध्ये प्रवेश दिला नाही. ही बाब आरोपी अंकित सिंगला समजताच, घटनास्थळी जाऊन गोंधळ घातला आणि पीडित तरुणीच्या घरात जाऊन केक दिला. तो केक तरुणीने न स्वीकारल्याने तिला मारहाण केली.
या प्रकरणाची तक्रार आमच्याकडे प्राप्त होताच,आरोपी अंकित सिंग विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास करण्यात येत असल्याचे ( Pune) त्यांनी सांगितले.