नाशिक पोलिसांचा सोशल मीडियावर वॉच, भाईगिरी करणाऱ्यांना.
नाशिक : मागच्या दोन दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यात जिल्ह्यात एका तरुणांचा खून झाला. हा खूप भरदिवसा बाजारपेठेत झाल्यामुळे गँगवार पुन्हा चर्चेत आलं आहे.दोन्ही ग्रुपकडून एकमेकांना मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर दोन्ही ग्रुप एकमेकांना संपवण्याच्या गोष्टी करीत होत्या. दोन्ही ग्रुपकडून सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल (viral video) करण्यात आले आहेत. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी पाच जणांच्या टोळीला ताब्यात घेतले आहे. त्यांना ज्या व्यक्तींनी मदत केली आहे, त्यांची सुध्दा चौकशी होणार असल्याची माहिती नाशिक पोलिसांनी जाहीर केली आहे.
संदीपला संपवल्यानंतर सोशल मीडियावर खुनाची कबुली
संदीप आठवले या तरुणाचा ओम पवार यांच्या टोळीने खून केला. विशेष म्हणजे संदीप आठवले याने ओम पवार याला मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यामुळे ओम पवार मनातून अधिक दुखी झाला होता. त्यामुळे संदीप आठवले याला संपवण्यासाठी ओम पवार नियोजन करीत होता. संदीप एका ठिकाणी येणार असल्याची माहिती त्याला मिळाली. त्यावेळी पाच तरुणांनी त्याच्या असंख्य वार केले. ओम पवार या तरुणाने संदीपला संपवल्यानंतर सोशल मीडियावर खुनाची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला आणि त्यांच्या साथिदारांना अटक केली.
भाईगिरी रील्स शेअर करणाऱ्यांना पोलिसांचा इशारा
“गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात कथित भाई आणि त्यांच्या समर्थकांकडून गुन्हेगारी, भाईगिरीचे रील्स सोशल मीडियावर पोस्ट केले जात आहेत. या आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांना पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. या कथित भाईंकडून वर्चस्व निर्माण करण्यासाठी गुन्हेगारी रिल्स शेअर केले जात आहेत. त्यातून गुन्हेगारी घटना घडत आहे. मागच्या आठवड्यात अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवाजी चौक येथे इंस्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट केल्याच्या वादातून एका तरुणाचा खून झाला होता” अशी माहिती किरणकुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त, यांनी दिली.