नवऱ्याच्या मारहाणीला वैतागलेल्या पत्नीने घेतला टोकाचा निर्णय, 3 शार्प शूटर्सला दिलं काम, थोडीसी चूक.
नवी दिल्ली : त्रास देत असलेल्या पतीचा कायमचा काटा काढायचा असं पत्नीनं मनात पक्क केलं. त्यासाठी तिच्या शाळेतील एका मित्राची तिने मदत घेतली असल्याचं उघड झालं आहे. दोघांनी एक भन्नाट प्लॅन तयार केला.
विशेष म्हणजे नवऱ्याला मारण्यासाठी तिने आठ लाख रुपये दिले. त्याच प्लॅनिंग सुध्दा व्यवस्थित केलं. ज्यावेळी सकाळी नवरा कुत्रा फिरवण्यासाठी बाहेर पडला. त्यावेळी दोन बाईकवरुन आलेल्या तीन व्यक्तींनी त्या व्यक्तीवर गोळी चालवली. त्यावेळी तिथं असलेल्या लोकांनी तिच्या नवऱ्याला जवळच्या रुग्णालयात (crime news) दाखल केलं. त्यानंतर डॉक्टरांनी कानपूर रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना उत्तर प्रदेश (up crime news in marathi) राज्यातील जालौन जिल्ह्यातील असल्याची माहिती पोलिसांनी जाहीर केली आहे.
एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, हा संपूर्ण प्रकार उत्तर प्रदेश राज्यातील जालौन जिल्ह्यातील आहे. तिथं कुठौंदा गावातील रहिवासी संजय राजपूत आणि अंजली हे दोघे राहत होते. परंतु पत्नीने आरोप केला आहे की, मागच्या काही दिवसांपासून तिचा पती तिला मारहाण करीत होता. त्यामुळे ती चांगलीच वैतागली होती. वैतागलेल्या पत्नीने त्यामुळे टोकाचा निर्णय घेतला. पत्नीने त्यांच्या शाळेतील एका मित्राची मदत घेतली आणि प्लॅन तयार केला.
मित्राने शार्प शूटर्सशी संपर्क साधला, त्याचबरोबर पत्नीनं तिचा नवरा सकाळी पाच वाजता कुत्रा फिरवण्यासाठी बाहेर जातो हे सुध्दा शार्प शूटर्सला सांगितले होते. संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर या सगळ्याचा प्लॅन तयार करण्यात आला. ज्यावेळी त्या पती बाहेर निघाला. दोन बाईकवाल्यांनी त्यांच्या गोळीबार केला.
या संपूर्ण प्रकरणाची माहिती पोलिस अधीक्षक असीम चौधरी यांनी दिली आहे. संजयला त्यांनी जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केलं होतं. त्यांची अवस्था वाईट झाल्यानंतर त्यांना कानपूरच्या रुग्णालयात दाखल केलं. पोलिसांनी पत्नीला आणि तीन शार्प शूटर्सला ताब्यात घेतलं आहे. अजून चार आरोपींच्या पोलिस शोधात आहेत.