कोडीत येथे आमदार आपल्यादारी कार्यक्रमाला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कोडीत येथे आमदार आपल्यादारी कार्यक्रमाला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सासवड : कोडीत ता. पुरंदर येथे , पुरंदर हवेली विधानसभा मतदार संघाचे लोकप्रतिनिधी आमदार संजय जगताप यांच्या संकल्पनेतून मतदार संघात सुरु केलेल्या आमदार आपल्यादारी या कार्यक्रमाला कोडीत ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन ,नागरीकांनी सामाजिक व व्यक्तीगत प्रश्न आमदार संजय जगताप यांच्यासमोर मांडले, हे प्रश्न तात्काळ सोडविण्याबाबत , आमदार जगताप यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या, यावेळी, महसुल प्रशासन, सार्वजनिक बांधकाम , पोलीस प्रशासन, महावितरण विभाग कृषी विभाग,पी.एम आर.डी , छोटे पाटबंधारे यांसह सर्व शासकीय विभागांचे प्रतिनिधी यासह , ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळी ठीक ११ – ०० वाजता आमदार संजय जगताप व शासकीय अधिकारी यांचे कोडीत बु ” येथे आगमन झाले , सुरुवातीला बौध्द वस्तीतील लक्ष्मीमाता मंदीराचा सभामंडपाचे काम व पिंपळाच्या पाराची पाहणी करण्यात आली, तदनंतर फोडजाई माता मंदिर दोन गावाला जोडणार्या पुलापर्यंत संरक्षण भिंत बांधण्यात बाबत चर्चा करण्यात आली, यावेळी आमदार संजय जगताप यांनी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता यांना सदर कामाचे अंदाजपत्रक तयार करायला सांगितले, यावेळी, काॅंग्रेस पक्षाचे नेते नंदूकाका जगताप गावचे पोलीस पाटील गणेश बडधे, श्रीनाथ म्हस्कोबा महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब बडधे,विष्णूदादा भोसले, माजी सरपंच व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक शेखर बडधे, माजी सरपंच ज्ञानदेव आबा जरांडे बापूसाहेब बडधे , कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती बापू औचरे , कोडीत खुर्द चे सरपंच विशाल कांबळे, माजी सरपंच आण्णासाहेब खैरे आदी मान्यवर उपस्थित होते,
तदनंतर मारुती मंदीरात आमदार संजय जगताप यांनी, नागरीकांशी संवाद सादत, नागरीकांचे प्रश्न जाणून घेतले, यावेळी, नागरीकांनी रेशनिंग कार्ड, संजय गांधी निराधार योजना, पंतप्रधान कृषी स्वाभिमान योजना, वारस नोंदी , याबाबतचे महसुल विभागाच्या प्रश्नावर येणाऱ्या समस्या शिधापत्रिका असून धान्य मिळत नाही, वारस नोंदी इतर नोंदी, व उत्पन्नाचे दाखले काढण्यासाठी आर्थिक शोषण होत असल्याच्या तक्रारी मांडल्या, दारुधंदे, बंद करणे बाबत देखील नागरीकांनी आमदारांना साकडे घातले, महावितरण विभागाच्या अनेक त्रुटी बाबत, व महावितरण विभागाच्या गलथान कारभाराचा पाढा , यामध्ये पोल संदर्भात डेपीमधील फ्यूज बाबत , वीजचोरी बाबत , विहीरीजवळ जीवीतहाणी होण्यास कारणीभूत असणाऱ्या लोंबत्या तारा याबाबत नागरीकांनी अधिकार्यांना खडे बोल सुनावले, यावेळी आमदार संजय जगताप यांनी अधिकारी यांना धारेवर धरुन, कामकाजा बाबत नापसंती व्यक्त करुन, तात्काळ समस्या सोडविण्याचे आदेश दिले, यावेळी कोडीत सोमर्डी रस्ता, म्हस्कोबा महाराज मंदीरा मागून आप्पा बडधे यांच्या घरामागून डुबईवाडी कडे जाणारया रस्त्यावर २० लक्ष रुपये टाकल्याचे जाहीर केले, तसेच कोडीत पोखर रस्त्यांची पाहणी करुन, त्या रस्त्याचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या, यावेळी नागरीकांच्या अनेक तक्रारीचा निपटारा आमदार संजय जगताप यांनी जागेवर केल्यामुळे कोडीतकर नागरीक खुश झाले, यावेळी काळूबाई मंदीराकडून जाणारा वाडीवस्तीवरील रस्ता, करण्याचे आश्वासन ,मलई वस्तीवरील पोल देण्याबाबतचे आदेश आमदार जगताप यांनी अधिकारी यांना दिले, यावेळी श्रीनाथ म्हस्कोबा महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब बडधे, यांनी रविवार आमवश्या पौर्णिमा व गुरुवार या दिवशी भाविकांची गर्दी ही लक्षणीय असते त्यामुळे तांबोळी ते नारायणपूर रस्त्याच्या रुंदी करण्याची आग्रही मागणी केली, तसेच सद्य स्थितीत देवस्थान ट्रस्टचे केलेली पाण्याची सुविधा ही भाविकांच्या वाढत्या संख्येमुळे कमी पडत आहे. त्यामुळे स्वतंत्र पाईप लाईन, व विहीर करुन , हा प्रश्न सोडवावा अशी मागणी बाळासाहेब बडधे यांनी केली, यावेळी बाजीराव नाना बडधे, माजी सरपंच चंद्रकांत आण्णा बडधे, पोलीस पाटील गणेश बडधे सिताराम बडधे, यासह विविध नागरीकांनी सामाजिक प्रश्न मांडले, यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ व महिला उपस्थित होते, कार्यक्रमाचे प्रास्ताविक विष्णूदादा भोसले यांनी केले तर सुत्रसंचालन व आभार माजी सरपंच ज्ञानदेव आबा जरांडे यांनी मानले.