ताज्या बातम्यामहाराष्ट्र

आदिवासींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणार


नागपूर:विदर्भाच्या दुर्गम भागात राहणार्‍या आदिवासींचे जीवन आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक व आरोग्याच्या दृष्टीने सुसह्य करणे आणि एकलव्य एकल विद्यालयाच्या माध्यमातून आदिवासींना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणणे यासाठी कै.
लक्ष्मणराव मानकर स्मृति संस्था मागील 27 वर्षापासून प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका पत्रकार परिषदेत केले.कै. लक्ष्मणराव मानकर स्मृति संस्थेच्या वतीने रेशीमबाग येथे सुरू असलेल्या शिक्षक-पर्यवेक्षक प्रशिक्षण वर्गाची माहिती देताना गडकरी बोलत होते. यामध्ये 1016 शिक्षक आणि 124 पर्यवेक्षक असे एकूण 1 हजार 140 अध्यापक सहभागी झाले आहेत. मानकर स्मृति संस्था सातत्याने आदिवासी भागामध्ये काम करत आहे.

आदिवासींना शैक्षणिक, सामाजिक तसेच आरोग्य व रोजगाराच्या संदर्भात मार्गदर्शन करीत आहे.Tribals याच मालिकेत एकलव्य एकल विद्यालय कार्य करीत आहे. ज्या गावांमध्ये एकल विद्यालय स्थापन झाले तिथे शिक्षणाप्रती आवड निर्माण करण्यात यश आले आहे. त्यामुळे तिथे शाळा सोडण्याचे प्रमाणही शुन्य झाले आहे. कोरोना काळात केलेल्या कामाची माहितीही गडकरी यांनी दिली. पत्रपरिषदेला संस्थेचे सचिव राजीव हडप, कोषाध्यक्ष अतुल मोहरीर, सदस्य धनंजय बापट, सुधीर दिवे, अ‍ॅग्रोव्हिजन फाउंडेशनचे सचिव डॉ. सी. डी. मायी उपस्थित होते.

प्रशिक्षण वर्गाचा रविवारी समारोप

मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या प्रशिक्षण वर्गाचा समारोप रविवार 27 ऑगस्ट रोजी सायं. 6 वा. होणार असून याप्रसंगी इंडिया टीव्हीचे रजत शर्मा विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच केंद्रीय नितीन गडकरी कार्यक’माच्या अध्यक्षस्थानी राहतील. तर जितेंद्रनाथ महाराज यांची प्रामु’याने उपस्थित राहतील.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button