लॉजवर मैत्रिणीसोबत गेला, शक्तिवर्धक गोळ्यांच्या अतिसेवनाने तरूणाचा मृत्यू
शक्तिवर्धक गोळ्यांच्या अतिसेवनाने तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्यात घडली आहे.
२३ वर्षिय मैत्रिणीसोबत त्याची ओळख झाली. नंतर मैत्री झाली आणि मैत्रिचे प्रेमात रुपांतर झाल्यानंतर दोघेही भंडाऱ्यात रात्र एकत्र घालवण्यासाठी एका लॉजवर थांबलेत. यावेळी तरुणाने ‘वायग्रा’ गोळ्यांचं अतिसेवन केलं आणि त्यातच त्याचा रक्तदाब वाढल्याने हृदयविकाराने त्याचा मृत्यू झाला.
व्हायग्राच्या दोन गोळ्यांच्या सेवनाने तरुणाचा वाढला होता रक्तदाब
२७ वर्षीय तरुण आणि २३ वर्षीय तरुणी दोघेही भंडाऱ्यात दिवसभर फिरले. शॉपिंग केली आणि रात्र एकत्र घालवायची म्हणून दोघांनीही भंडारा बस स्टॉप जवळच्या हिरणवर लॉजवर मुक्काम करण्याचा बेत आखला. यावेळी तरुणाने मेडिकलमधून ‘व्हायग्रा’ 100 mg शक्तीवर्धक गोळ्या खरेदी केल्या. तरुणीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी या तरुणाने चार पैकी दोन गोळ्यांचं म्हणजेच एकाचवेळी 200 ग्राम गोळ्यांचं सेवन केलं.
अति डोसमुळे त्याचा रक्तदाब वाढला आणि त्यातच त्याला हृदयविकाराचा झटका झटका येऊन त्याचं शरीर थंडगार पडलं. तरुणासोबत असलेल्या तरुणीने लॉजच्या कर्मचाऱ्यांना बोलवून तरुणास रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात नेताच डॉक्टरांनी तरुणाला मृत घोषित केलं. या प्रकरणाची भंडारा पोलिसांकडून नोंद करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.