वानखेडे स्टेडियमच्या ५२९ सीटसाठी ५० कोटींची ऑफर, MCA ने चक्क नाही म्हणून सांगितलं
वनडे वर्ल्डकप 2023 भारतीय भूमीवर होणार आहे. या स्पर्धेतील पहिला आणि विजेतेपदाचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. त्याचबरोबर मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरही अनेक महत्वाचे सामने होणार आहेत.मात्र, विश्वचषकापूर्वी मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) ५० कोटी रुपये कमावण्याची संधी सोडली आहे.
वास्तविक, मुंबई क्रिकेट असोसिएशनने याआधी वानखेडे स्टेडियमवरील गेस्ट बॉक्सच्या तिकिटांमधून १०० कोटी रुपयांची कमाई झाली आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशनला ५० कोटींची ऑफर
मुंबई क्रिकेट असोसिएशनपुढे वर्ल्डकपसाठीही असाच एक प्रस्ताव आला होता. पण एमसीएने तो नाकारला आहे. स्टेडियमवरील महत्वाच्या भागात म्हणजेच, विठ्ठल दिवेचा पव्हेलियनमध्ये गेस्ट बॉक्स बनवण्याचा हा प्रस्ताव होता. जेणेकरून या गेस्ट बॉक्समधील तिकिटे महागात विकता येतील. पण तो प्रस्ताव मुंबई क्रिकेट असोसिएशनने फेटाळला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, DreamSetGo आणि कटिंग एज या ३ कंपन्यांनी हॉस्पिटॅलिटी बॉक्ससाठी सुमारे ५० कोटी रुपयांची ऑफर दिली होती, परंतु मुंबई क्रिकेट असोसिएशनने ही ऑफर नाकारली. वास्तविक, ही ऑफर स्टेडियमधील ५२९ जागांसाठी होती. DreamSetGo आणि कटिंग एज यांना पुढील १० वर्षांसाठी टायअप करायचे होते.
एमसीएने करोडो रुपये का नाकारले?
दरम्यान, विठ्ठल दिवेचा पॅव्हेलियन हा परंपरेने मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सदस्यांसाठी राखीव आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने हा करार नाकारला, कारण त्यांना विश्वास होता की हा करार झाला तर भरपूर पैसे मिळतील, पण त्याचा परिणाम मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सदस्यांवर होईल. कारण त्यांना सामन्याची तिकीटे मिळणार नाहीत. त्यामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशनने सुमारे ५० कोटींची ऑफर नाकारली.