सिंदखेडराजा तालुक्यात फक्त 34 टक्के पाऊस कपाशीची वाढ खुंटली
सिंदखेडराजा तालुक्यात यावर्षी सरासरी पेक्षा कमी पाऊस पडत असल्याने कपाशीसह सोयाबीन , मूग , उडीद , तुर या खरीप पिकावर संक्रांत येण्याची शक्यता आहे . कपाशीची वाढ खुंटली असून सोयाबीन फुलात आले आहे .त्यामुळे उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे .
सिंदखेडराजा तालुक्यात मागील जुलै महिन्यात किनगावराजा आणि दुसरबीड मंडळात चांगला पाऊस झाला होता . सिंदखेडराजा , साखरखेर्डा , मलकापूर पांग्रा , शेंदुर्जन मंडळात सरासरी पेक्षा 50 टक्के पाऊस cotton growth कमी झाला आहे . जून , जुलै महिन्यात पडलेली पावसाची तुट ऑगस्ट महिन्यात नक्किच भरुन निघेल , असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता . परंतू 21 ऑगस्ट पर्यंत सिंदखेडराजा मंडळात फक्त 38:04 ,. किनगावराजा मंडळात 20:08 , मलकापूर पांग्रा मंडळात 25:07 , दुसरबीड मंडळात 28:00 , सोनोशी मंडळात 24:04 , शेंदुर्जन मंडळात 43:05 , आणि साखरखेर्डा मंडळात 84:07 पावसाची नोंद झाली आहे.
जुलै महिन्यात पडलेल्या पावसाचे प्रमाण सरासरी 136 टक्के असताना ऑगस्ट महिन्यात मात्र तेच प्रमाण 21 पर्यंत फक्त 34 टक्के आहे . त्यात साखरखेर्डा वगळता इतर सहा मंडळात फक्त 10 टक्केही पाऊस नाही. cotton growth सिंदखेडराजा , सोनोशी , किनगावराजा आणि दुसरबीड या भागात कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणात होते. एक महिन्यापासून पाऊसाने दडी मारल्याने कपाशीची वाढ खुंटली आहे . फुलात येणारी कपाशी रोपट्यात आहे . तर सोयाबीन फुलात आले असताना पाऊस नसल्याने फुले गळत आहे . एकूणच खरीप पिकाला चांगला फटका बसणार आहे.