पुणे-मुंबई महामार्गावर ११ गाड्यांच्या अपघातांच्या आठवणी ताज्या, पुन्हा असाच झाला अपघात
पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर अनेकदा अपघात होत असतात. परंतु एप्रिल महिन्यात ११ वाहनांचा विचित्र अपघात झाला होता. या अपघाताच्या वेळी अकरा वाहने एकमेकांवर धडकली होती.आहेत. एक्स्प्रेस वेवरील खोपोली एक्झिटजवळ झालेल्या या अपघाताची आठवण करुन देणारा अपघात सोमवारी झाला. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर दोन जण जखमी झाले आहे. अपघातानंतर वाहतूक संथ गतीने सुरु आहे.
कसा झाला अपघात
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर मोठा अपघात झाला आहे. पुणे शहराकडून कंटनेर मुंबईकडे जाण्यासाठी निघाला होता. कंटनेरचा प्रवास 35 किलोमीटर झाला. त्यावेळी विरुद्ध लेनमध्ये कंटनेर घुसला. त्यानंतर एकामागे एक पाच वाहनांना धडक दिली. या धडकेत मारुती डिजायर (MH48 A6512) या गाडीचा चालक आणि त्यातील एका महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यांची नावे अजून स्पष्ट झाली नाही. या अपघातात पाच जण जखमी झाले आहे. जखमी झालेल्या व्यक्तींना पनवेल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खोपोली फूड मॉलजवळ पुणे लेनवर ही घटना घडली.
अपघातानंतर वाहतुकीवर परिणाम
सोमवारी झालेल्या या अपघातानंतर वाहतुकीवर परिणाम झाला. मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरळीत सुरु आहे तर पुण्याकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरु आहे. दरम्यान या अपघातामुळे २७ एप्रिल रोजी झालेल्या अपघाताच्या आठवणी ताज्या झाल्या आहे. त्या अपघातात ११ वाहने एकमेकांवर आदळली होती. मुंबईच्या दिशेने येणाऱ्या एक ट्रकने अकरा वाहनांना धडक दिल्यानंतर हा भीषण अपघात झाला होता.