ताज्या बातम्या

विकासासाठी नाही तर ईडीमुळे काही जण भाजपमध्ये गेले, शरद पवार यांचा भाजपवर जोरदार हल्ला


भाजप सत्तेचा गैरवापर करत आहे. त्यांच्याकडून ईडी, सीबीआय आणि तपास यंत्रणांची भीती दाखवली जात आहे. ईडीच्या कारवाईमुळेच आमच्यातील काहीजण भाजपमध्ये गेले आहेत. ते विकासासाठी गेले असल्याचे सांगतात, मात्र त्यात काही अर्थ नसल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर हल्ला चढवला.पुण्यात आयोजित केलेल्या सोशल मीडियाच्या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. ते म्हणाले, आमच्या काही सहकाऱयांनी मार्ग बदलला, ते भाजपसोबत आहेत. विकासासाठी भाजपसोबत गेल्याचे ते सांगतात, पण त्यात काही अर्थ नाही. मात्र,राष्ट्रवादीकोण आहे, हे जनतेला चांगले माहिती आहे. आमची राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका बदललेली नाही. मात्र, काही कारणांमुळे काहीजण मार्ग बदलून वेगळ्या काटेने जात असतील, पण अशा भेकड प्रकृत्तींना जनता मार्ग दाखवेल.

 

अनिल देशमुख तुरुंगात गेले, खासदार संजय राऊत तुरुंगात गेले. मात्र, त्यांनी भूमिका सोडली नाही, ते भाजपात गेले नाहीत, असे नमूद करून शरद पवार म्हणाले, सत्ताधाऱयांकडून धार्मिक, सामाजिक तेढ पसरकत आहे. ही भूमिका देशाच्या जनतेच्या आणि राज्याच्या हिताची नाही, ही घातक आहे. त्याकिरोधात उभे राहण्याची गरज असल्याचे सांगितले.

 

फाळणीचा रक्तरंजित इतिहास सीबीएसईच्या अभ्यासक्रमातून वगळावा

 

देशाच्या फाळणीचा रक्तरंजित इतिहास सीबीएसईच्या अभ्यासक्रमात शिकविला जात आहे; पण त्यामुळे नव्या तरुण पिढीवर विपरित परिणाम होतो. त्यामुळे सीबीएसईच्या अभ्यासक्रमातून फाळणीचा रक्तरंजित इतिहास वगळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सीबीएसई बोर्डाला आपले मत कळवावे, अशी सूचना ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. धनकवडी येथील सरहद पब्लिक स्कूलच्या नूतन इमारतीचे आणि गोपाळ कृष्ण गोखले प्रबोधिनीचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पवार बोलत होते.

 

तरुणांची रोजगाराची संधी हिरावली

 

देशात महागाई, बेरोजगारी, शेतकऱयांच्या समस्या यांसारख्या अनेक प्रश्न आहेत. राज्यातील अनेक प्रकल्प राज्याबाहेर गेले. त्यामुळे राज्यातील तरुणांची रोजगाराची संधी हिराकली गेली आहे. गेल्या 6 महिन्यांत राज्यातील अनेक प्रकल्प गुजरातला गेले. राज्य सरकारकडून अनेक प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button