ताज्या बातम्यामहाराष्ट्र

आयटीआय उत्तीर्ण तरुणही सैन्यात होऊ शकतात अग्निवीर; जाणून घ्या सविस्तर…


नवी दिल्ली : भारतीय सैन्यात तरुणांची भरती आता अग्निवीर अंतर्गत केली जात आहे. आयटीआय पास आणि डिप्लोमाधारकही भारतीय लष्करात अग्निवीर होऊ शकतात. त्यासाठी सैन्यदलामार्फत टेक्निकल शाखेअंतर्गत भरती केली जाते.
फिटर, टेक्निशियन, मोटर मेकॅनिक यासह अनेक पदांवर ही भरती असते. अर्ज लष्कराच्या अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in द्वारे केले जातात.

अर्ज करण्यासाठी तरुणांनी संबंधित ट्रेडमध्ये आयटीआयसह दहावी उत्तीर्ण असले पाहिजे. भरतीसाठी लष्कराच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. अर्ज करताना उमेदवारांना आपली सर्व शैक्षणिक इत्यादी कागदपत्रे अपलोड करावी लागतील. अग्निवीर भरतीमध्ये आयटीआय उत्तीर्ण तरुणांना सैन्य इतर उमेदवारांपेक्षा प्राधान्य देते. त्यांना किमान 20 ते कमाल 50 गुणांपर्यंतचा बोनस दिला जातो.

या पदांवर केली जाते भरती
टेक्निकल श्रेणी अंतर्गत, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक आणि कम्प्युटर यांसारख्या क्षेत्रांसाठी भरती असते. तसेच, टेक्निकल सहाय्यक श्रेणीमध्ये लेखा, स्टोअरकीपर आणि लिपिक यासारख्या पदांवर भरती केली जाते. याशिवाय, फिटर, वेल्डर, कारपेंटर, मोटार मेकॅनिक आणि टेक्निशियन अशा अनेक पदांवर भरती केली जाते.

कशी केली जाते निवड?
या पदांवरील उमेदवारांची निवड लेखी चाचणी, शारीरिक कार्यक्षमता चाचणी आणि वैद्यकीय तपासणीनंतर केली जाते. निवड झालेल्या उमेदवारांना लष्कारतर्फे प्रशिक्षण देखील दिले जाते. त्यानंतर त्यांची नियुक्ती केली जाते.

अशाप्रकारे अर्ज करू शकता
– लष्कराच्या अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in वर जा.
– नोटिफिकेशनवर क्लिक करा आणि वाचा.
– अर्जाच्या लिंकवर क्लिक करा.
– सर्व शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करा.
– आता सबमिट करा.

दरम्यान, अग्निवीर अंतर्गत 4 वर्षांसाठी सैन्यात तरुणांची भरती होते. याबरोबर बारावीनंतर एक वर्षाचा आयटीआय डिप्लोमा केलेल्या उमेदवारांना 30 गुणांचा बोनस दिला जातो, तर बारावीनंतर दोन वर्षांचा आटीआय डिप्लोमा केलेल्या उमेदवारांना 50 गुणांचा बोनस दिला जातो.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button