दसरा व दिवाळीच्या निमित्ताने तरी बीड नगर प्रशासनानी तात्काळ दखल घेऊन स्वच्छता,वीज पाणी व रस्त्याची व्यवस्था करणे गरजेचे : नवनाथ अण्णा शिराळे पाटील

येणाऱ्या दसरा व दिवाळीच्या निमित्ताने तरी बीड नगर प्रशासनानी तात्काळ दखल घेऊन स्वच्छता,वीज पाणी व रस्त्याची व्यवस्था करणे गरजेचे : नवनाथ अण्णा शिराळे पाटील
बीड : बीड शहरांमध्ये सध्या जागोजागी रस्त्याची दुरवस्था झाली असून नागरिकांना चालताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डे आहेत हेच समजत नाही आणि सध्या बीड शहराच्या जवळ असलेले बिंदुसरा प्रकल्प वोसांडून वाहत असताना देखील बीड शहराला पंधरा ते वीस दिवसाला पाणी सोडले जाते हे बीड करांचे दुर्दैवआहे की काय अशी भावना बीडकर व्यक्त करीत आहेत
अशा प्रकारे शहरातील नागरिकांमधून संतापताची लाट सध्या व्यक्त होत आहे तोंडावरच दसरा व दिवाळी येऊन ठेपलेली आहे सध्या पितृ पक्ष पंधरवाडा चालू असून महिला भगिनी घरातील भांडे धूने कपडे दसऱ्यानिमित्त धुण्यासाठी काढत असतात तसेच घरोघरी रंग रगोटी देखील केली जाते परंतु पाण्याअभावी ही कशी रंगरंगोटी करावी कसे धुणे धुवावे कसे भांडे मोठे धुने करावे कसे मोठे मोठे टेबल बाकडे खुर्च्या घरातील सर्वच साहित्य पंखा सह सर्व साहित्य धुण्यासाठी पाणी लागते परंतु 15 ते 20 दिवसाला बीड शहराला पाणी सोडले जाते मग हे कसे साहित्य हे धुवायचे पाण्याअभावी तसेच ठेवायचे की काय असा प्रश्न देखील माता भगिनींना बीड शहरातील पडलेला आहे
क्षिरसागर यांची सत्ता बीडला असल्यापासून बीड शहराला पंधरा ते वीस दिवसाला पाणी मिळत आहे आणि आता सध्या नगरपालिकेचे असलेले प्रशासक साहेब यांनी या महत्त्वाच्या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ दररोज बीडकरांना पाणी सोडावे असे नागरिकांमधून बोलले जात असल्याचे मा नवनाथ अण्णा शिराळे पाटील यांनी प्रसिद्धी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून म्हटले आहे
जर येणाऱ्या दोन दिवसात जर बीड शहराला पाणीपुरवठा जर सुरू नाही केला तर बीड नगर प्रशासनाला कुलूप ठोकले जाईल असा इशारा देखील शिराळे पाटील यांनी दिला आहे याची दखल प्रशासक ओसिओ मुख्याधिकारी नगर परिषद बीड यांनी घ्यावी असे आवाहन देखील भारतीय जनता पार्टीचे नेते तथा बीड नगर परिषदेचे माजी सभापती मा नवनाथ अण्णा शिराळे पाटील यांनी केले आहे
तसेच बीड शहरातील गल्लोगल्ली मध्ये सध्या अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे म्हणून येणाऱ्या हिंदूंचा महत्त्वाचा असणाऱ्या या सणाच्या निमित्ताने दिवाळी आणि दसऱ्याच्या निमित्ताने तरी बीड नगर प्रशासनाने लाईटची व्यवस्था खंब्यावर लाईट लावून करावी महत्त्वाच्या ठिकाणी शहरातील प्रत्येक गल्लीमध्ये बीड शहराचे दैवत असलेला श्री खंडेश्वरी मंदिर परिसरामध्ये देखील लाईट व्यवस्था करावी महाराष्ट्राची श्री कुलस्वामिनी तुळजाभवानी यांचे ठिकाण असलेल्या बीड शहरातील खासबाग परिसरामध्ये देवीच्या परिसरामध्ये देखील नाईट ची पाण्याची व्यवस्था करावी बीड शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी महत्त्वाच्या पोलवर लाईट बसवावे व रिपेरिंग दुरुस्ती करावी असे आव्हान देखील मा नवनाथ अण्णा शिराळे पाटील माजी सभापती नगरपरिषद यांनी केले आहे











