तलाठी पदासाठी आजपासून परीक्षा
तलाठी भरतीसाठी यंदा विक्रमी दहा लाखांपेक्षा जास्त आलेले अर्ज, परीक्षेसाठी शारीरिक विकलांग आणि महिला उमेदवारांना दिलेले प्राधान्य, अनेक उमेदवारांनी निवडलेले राज्यातील ठराविकच जिल्हे या व अशा विविध कारणांमुळे तलाठी भरती परीक्षेसाठी अनेक उमेदवारांना जिल्ह्याबाहेर परीक्षा केंद्र मिळाले आहे.त्यामुळे उमेदवारांमध्ये नाराजी आहे. दरम्यान, गुरुवारपासून राज्यात तलाठीपदाची परीक्षा सुरू होणार आहे. 4 हजार 466 पदांसाठी 10 लाख विद्यार्थी बसले आहेत. परीक्षा 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर या कालावधीत घेतली जाणार आहे. अनेक उमेदवारांना त्यांनी निवडलेल्या केंद्रापेक्षा दूरचे केंद्र मिळाल्याचे निदर्शनास आले आहे.
या पार्श्वभूमीवर जमाबंदी आयुक्त निरंजन सुधांशू यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक पार पडली. या बैठकीत गुरुवारपासून सुरू होणार्या परीक्षेबाबत चर्चा करण्यात आली. दरम्यान, उमेदवारांनी परीक्षेआधी दीड तास परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. परीक्षेसाठी आवश्यक प्रवेशिका टप्प्याटप्प्याने भूमी अभिलेख विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहेत, असेही अतिरिक्त जमाबंदी आयुक्त रायते यांनी सांगितले.
परीक्षेचे वेळापत्रक
परीक्षा दिनांक – 17, 18, 19, 20, 21, 22, 26, 27, 28, 29, 31 ऑगस्ट आणि 1, 4, 5, 6, 8, 10, 14 आणि 14 सप्टेंबर.
परीक्षेची वेळ
सत्र 1 – सकाळी 9 ते 11
सत्र 2 – दुपारी 12.30 ते 2.30
सत्र 3 – दुपारी 4.30 ते 6.30 वाजेपर्यंत