आंतरशालेय देशभक्तीपर गीत स्पर्धेत पोदार स्कूलचे यश
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका क्रीडा विभाग, स्मार्ट सिटी लिमिटेड, स्मार्ट सारथी आणि भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत अकॅडमीच्या वतीने आंतरशालेय देशभक्तीपर गीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत चिंचवड येथील पोदार स्कूलच्या संघाने उत्कृष्ठ कामगिरी करत द्वितीय पारितोषिक पटकावले.
‘चला गाऊया’ या देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा २०२३ माध्यमातनू विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीपर भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने या स्पर्धांचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले. २७ जुलै ते ७ ऑगस्ट २०२३ या दरम्यान ही स्पर्धा पार पडली. यामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील एकूण २५ शाळांनी सहभाग नोंदविला होता.
पोद्दार शाळेच्या वतीने संगीत शिक्षक गोपाल सुरवसे यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले. विजयी संघाचे शाळेच्या प्राचार्या शहनाज कोटार, उपमुख्याध्यापिका मनीषा घोसरवडे, वैशाली रणसुभे हर्मोनियम वादक उमेश पुरोहित, यांनी कौतुक केले. स्पर्धेतील विजयी विद्यार्थांना पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.