श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र उपक्रमास वडगावात महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
वडगाव मावळ, ता. १६ : येथील मोरया महिला प्रतिष्ठानच्या वतीने पुरुषोत्तम मासानिमित्त वडगाव शहरातील महिला भगिनीसाठी आयोजित करण्यात आलेल्या श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्रम् जप व हळदी कुंकू समारंभाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या कार्यक्रमात सुमारे अडीच हजार महिलांनी सहभाग घेतला. येथील भेगडे लॉन्स मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्रांचे हजारो जपनाम करण्यात आले. शहरातील श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्राचे सदस्य आणि भक्तगणांचे विशेष सहकार्य लाभले. कुलस्वामिनी महिला मंच अध्यक्षा सारिका शेळके, मयूर ढोरे, दीपाली गराडे, अबोली ढोरे, पूनम जाधव, माया चव्हाण, प्रमिला बाफना, पूजा वहिले, वैशाली कुडे आदी उपस्थित होते. उपस्थित महिला भगिनींचे मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली मयूर ढोरे यांनी आभार मानले.