मुख्यमंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर अखेरचा विराम? संपूर्ण मंत्रिमंडळाला ताजमध्ये डिनरसाठी बोलवलं.. सहपत्नीक आमंत्रण
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्याच्या पत्नी लता शिंदे यांच्याकडून सर्व मंत्र्यांसाठी स्नेहभोजन आयोजित करण्यात आले आहे. वांद्रे येथील ताज लॅन्डस् एन्ड येथे उद्या संध्याकाळी ७ वाजता हे स्नेहभोजन पार पडणार आहे.
अजित पवार गट मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट झाला, त्यानंतर हे पहिलंच स्नेहभोजन पार पडणार आहे.
त्याचबरोबर या स्नेहभोजनाच्या निमीत्ताने मंत्रिमंडळातील समन्वय संदर्भात चर्चा होणार आहे. एकनाथ शिंदे यांनी आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी आपल्या सहकारी मंत्र्यासाठी स्नेहभोजन आयोजित केले आहे. यासंबधीच्या निमत्रंण पत्रिका देण्यात आल्या आहे. उद्या संध्याकाळी ७ वाजता वांद्रे येथील ताज लॅन्डस् एन्ड येथे या स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.दरम्यान अजित पवार यांनी मंत्रिमंडळात प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच स्नेहभोजनाचे आयोजन केले आहे. तर गेल्या काही दिवसांमध्ये अजित पवारांच्या सरकारमध्ये सामिल होण्यामुळे शिंदे गटाचे आमदार, नेते, मंत्री नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. या चर्चांना पुर्णविराम देण्यासाठी या स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.राष्ट्रवादी(अजित पवार गट), शिवसेना(शिंदे गट), भाजप या तिन्ही पक्षांचे मंत्री या स्नेहभोजनाला सहकुटुंब उपस्थित असणार आहेत. या भोजनावेळी मंत्र्याची बैठकही होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर गेल्या काही दिवसात एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात कोल्ड वॉर सुरू असल्याची चर्चा सुरू होती. त्या चर्चेलाही पुर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.