ताज्या बातम्या
मुंबईत संघ आणि भाजपची संयुक्त बैठक
मुंबई : महाराष्ट्र भाजपचे काही निवडक नेते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही मंडळींची एक बैठक बुधवारी मुंबईत पार पडली. रा. स्व. संघाच्या लोअर परेल येथील यशवंत भवन या कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय संघटन मंत्री बी एल संतोष यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि संघातील काही वरिष्ठ मंडळींची उपस्थिती होती.या बैठकीबाबत अधिकृतपणे कुठलीही माहिती देण्यात आली नसली तरी भाजपाची संघटनात्मक बांधणी आणि इतर काही विषयांवर या बैठकीत चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.