ओसरगाव तलावात जल पर्यटनाचा शुभारंभ; स्थानिक युवकांनी तराफा बनवीत केला प्रयोग
कणकवली : कणकवली तालुक्यातील ओसरगाव तलावामध्ये गावातील गवळवाडीतील स्थानिक युवक यांनी साध्या पद्धतीचा तराफा बनवून जल पर्यटन करण्याचा शुभारंभ केला.
स्वखर्चाने बनवलेला तराफा स्वतःच्या जबाबदारीवर प्रायोगिक तत्त्वावर बोटिंग करण्याचा प्रयत्न केला.याप्रसंगी शुभेच्छा देण्यासाठी माजी उपसरपंच बबली राणे ,अक्षय राणे, नितीन धुरी, अक्षय शिंदे, सुरज कदम, सुनील राणे, महेश वारंग, चेतन राणे, किरण राणे, सोहेल शेख व गवळवाडीतील स्थानिक युवक उपस्थित होते. भविष्यात स्थानिक युवकांना बोटिंगला प्राधान्य देण्यासाठी हा स्थानिक युवकांनी केलेला प्रयत्न आहे. ओसरगाव तलावाला दिवसेंदिवस प्रसिद्धी मिळत असल्यामुळे नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न गावातील तरुण मंडळी करतात. त्यामुळे स्थानिक युवकांना देखील रोजगार मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे. कणकवली तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्यातील हॉटस्पॉट म्हणून ओसरगाव तलावाकडे पाहिले जाते येणाऱ्या काळात तलावाच्या आजूबाजूच्या परिसरात स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने चांगले उपक्रम राबवले जातील असे यावेळी सांगण्यात आले.