अतिक अहमद अशरफ हत्येच्या कटात पोलिस प्रशासन सामील होतं का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
नवी दिल्ली – कडक पोलीस बंदोबस्तात अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची हत्या सुनियोजित कट होता का? या कटामागे यूपी पोलिस आणि प्रशासनाचा हात होता का? अशी शंका देशातील कोणत्याही प्रसारमाध्यमांनी किंवा वृत्तसंस्थेने उपस्थित केली नाही, तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी उपस्थित केली आहे.
खरे तर या हत्याकांडाशी संबंधित एका याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाच्या न्यायायधीशांनी हा प्रश्न उपस्थित केला.
राष्ट्रवादीचे कोणतेही कार्यकर्ते भांडलेले नाही, मी शिवसेनेला…; सुप्रिया सुळेंचं विधान
माजी खासदार आणि माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्या हत्येचे व्हिडीओ संपूर्ण देशाने टीव्हीवर पाहिले. आजूबाजूला पोलीस होते. प्रत्येकाकडे शस्त्रे होती, परंतु असे असतानाही तीन हल्लेखोर पोलिसांचा सुरक्षा घेरा तोडतात आणि अचानक अतीक आणि अशरफच्या अगदी जवळ पोहोचतात. तिथं ते दोघांनाही मरेपर्यंत गोळ्या घालतात. हे सर्व पोलिसांच्या डोळ्यासमोर घडते.
शरद पवार कृषीमंत्री होणार का? नारायण राणे म्हणाले…
या दुहेरी हत्याकांडाचे व्हिडीओ देशाबरोबरच सर्वोच्च न्यायालयानेही पाहिले. पोलीस कोठडीतील या दुहेरी हत्याकांडावर सुप्रीम कोर्टाने खूप गंभीर आक्षेप घेतले. यामागे कोणाचा हात आहे. यामध्ये पोलिस किंवा प्रशासनातील व्यक्तींचा समावेश असण्याची शंका न्यायालयाने व्यक्त केली.
उत्तर प्रदेश सरकारला संतप्त सवाल
अतिक आणि अशरफ यांच्या हत्येत कोण सहभागी आहे?
पाच ते दहा पोलिसांच्या उपस्थितीत खून कसा झाला?
अतिक आणि अशरफ हत्या प्रकरणाचा तपास कुठे पोहोचला?