कृषी सेवक पदाच्या ९०० हून अधिक जागांसाठी भरती
मुंबई : कृषी सेवक पदांच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. कृषी सेवक पदांच्या तब्बल ९०० हून अधिक रिक्त पदांसाठी भरतीप्रक्रिया राबविली जात आहे. कृषी सेवक पदाच्या ९५२ रिक्त जागा या विविध जिल्ह्यांत असणार आहेत.
राज्य शासनाच्या कृषी व पदुम विभाग अंतर्गत रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. कृषी आयुक्तालयाच्या अधीनस्त असणाऱ्या विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयांसाठी ही भरती केली जात आहे.
या भरतीप्रक्रियेतून दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट- क संवर्गातील कृषी सहाय्यकांची रिक्त पदे कृषी सेवक म्हणून निश्चित वेतनावर नामनिर्देशनाने/सरळसेवेने स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्यात येणार आहेत. तसेच, सदर पदे भरण्याकरिता पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२३ असून त्यासाठीची सविस्तर जाहिरात कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
कृषी सेवक पदांच्या रिक्त ९५२ जागा ह्या औरंगाबाद १९६, लातूर १७०, नाशिक ३३६, कोल्हापूर २५० उमेदवारांना कृषी सेवक पदासाठी वेबसाइट https://krishi.maharashtra.gov.in/ वर उपलब्ध लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करायचे आहे. तसेच उमेदवार वर दिलेल्या लिंक वरून देखील थेट ऑनलाईन अर्ज करू शकतात.