येरवड्यातील कैद्यांना स्मार्ट कार्ड फोनद्वारे साधता येणार संवाद
पुणे : येरवडा कारागृहातील कैद्यांना आता आपल्या नातेवाईकांशी स्मार्ट कार्ड फोन द्वारे संवाद साधता येणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर येरवडा कारागृहात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.स्मार्ट कार्ड उपक्रम येरवडा कारागृहात सुरू करण्यात आला असून या द्वारे कैद्यांना थेट आपल्या नातेवाईकांशी संवाद साधता येणार आहे. हा उपक्रम जर यशस्वी झाला तर संपूर्ण राज्यात देखील हा राबवण्यात येणार असल्याचे गुप्ता यांनी सांगितले आहे.
अगोदर असलेले कॉइन बॉक्सची सुविधा बंद करण्यात आली होती. त्याने कैद्यांना नातेवाईकांशी संवाद साधायला अडथळा निर्माण होत होता. मात्र या सुविधेमुळे कैद्यांना संवाद साधणे सोपे होणार आहे. येरवडा कारागृहात असे ४० स्मार्ट कार्ड फोन बसवण्यात आले असल्याचे गुप्ता यांनी सांगितले आहे.