लंकेला मोठा धक्का ! हसरंगाने अचानक घेतली कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती, धक्कादायक कारण आले समोर
श्रीलंकेचा स्टार अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगाने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने स्वतः श्रीलंका क्रिकेट बोर्डाला याची माहिती दिली आहे.
हसरंगाने आपल्या निर्णयामागे महत्त्वाचे कारणही दिले आहे.
पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये जास्त वेळ खेळण्यासाठी हा निर्णय घेत असल्याचे त्याने म्हटले आहे. हसरंगा आयपीएलमध्ये तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे प्रतिनिधित्व करतो.
वानिंदू हसरंगाने कसोटी क्रिकेटला केला अलविदा
श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगाने अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत त्यांनी श्रीलंका क्रिकेट बोर्डाला माहिती दिली आणि बोर्डानेही त्यांचा निर्णय मान्य केला.
हसरंगाच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीबद्दल श्रीलंका क्रिकेटचे सीईओ ऍशले डी सिल्वा म्हणाले, “आम्ही त्याचा निर्णय स्वीकारू आणि आम्हाला विश्वास आहे की हसरंगा आमच्या पांढर्या चेंडूच्या क्रिकेट संघाचा महत्त्वाचा भाग असेल.”
निवृत्त होण्यापूर्वी हसरंगाने श्रीलंकेसाठी चार कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात त्याने एकूण 196 धावा केल्या आहेत आणि चार विकेट घेतल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्येही त्याचे अर्धशतक आहे.