मराठा आंत्रप्रेन्युअर्स असोसिएशनतर्फे ‘बिनव्याजी कर्ज’ वर मार्गदर्शन सत्र
पुणे मराठा आंत्रप्रेन्युअर्स असोसिएशनतर्फे उद्योग करू पाहणाऱ्या, तसेच उद्योजक तरुणांसाठी ‘बिनव्याजी कर्ज’ या विषयावर मार्गदर्शन सत्र आयोजिले आहे.
येत्या बुधवारी (दि. १६ ऑगस्ट २०२३) सायंकाळी ४ ते ७ या वेळेत फिरोदिया सभागृह, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था, विधी महाविद्यालय रस्ता, पुणे येथे हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष अरुण निम्हण यांनी दिली. Maratha Entrepreneurs Association (MEA)
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील आणि सहकार व कामगार कायद्याचे सल्लागार ऍड. सुभाष मोहिते उपस्थित राहणार आहेत. उद्योग उभारण्यासाठी लागणारे कर्ज बिनव्याजी कसे घ्यावे, त्याचे स्वरूप कसे असते, त्यासाठी आवश्यक गोष्टी कोणत्या? अशा विविध शंकांचे निरसन या सत्रात होणार आहे, असेही निम्हण यांनी नमूद केले. Maratha Entrepreneurs Association (MEA)