खुशखबर! आज सोन्याचे भाव जोरदार घसरले, तुमच्या शहरातील आजचे सोन्याचे नवे दर पटापट तपासून घ्या
सोन्या-चांदीच्या दरात घसरण सुरूच आहे. गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात झालेली घसरण या आठवड्यातही कायम आहे. आज म्हणजेच सोमवारी सोनं स्वस्त झालं आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आज सोन्याचा भाव 58800 च्या जवळ आहे.
तर चांदीही 69800 च्या जवळ घसरली आहे.
एमसीएक्सवर आज सोन्याचा भाव 0.06 टक्क्यांनी घसरून 58,870 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. याशिवाय चांदीचा भाव आज 0.18 टक्क्यांनी घसरून 69850 रुपये प्रति किलो ग्रॅम झाला आहे.
15 मे रोजी सोन्याचा भाव 61567 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर होता. तर एमसीएक्सवर आज सकाळी साडेअकरा वाजता सोने 58,887 च्या पातळीवर आहे. त्यानुसार गेल्या 3 महिन्यांत सोन्याच्या दरात जवळपास 2700 रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीही 4700 रुपयांनी स्वस्त झाली आहे.
याशिवाय चांदीच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर 15 मे रोजी चांदीचा भाव 74524 रुपये प्रति किलोच्या पातळीवर होता. तर चांदीचा भाव आज 69830 रुपये प्रति किलो आहे. त्यानुसार चांदीही जवळपास 4700 रुपयांनी स्वस्त झाली आहे.
- *छत्रपती संभाजीनगर- 22 कॅरेट सोने : 54650 रुपये, 24 कॅरेट सोने : 59620 रुपये
* भिवंडी – 22 कॅरेट सोने : 54680 रुपये, 24 कॅरेट सोने : 59670 रुपये
* कोल्हापूर – 22 कॅरेट सोने : 54650 रुपये, 24 कॅरेट सोने : 59620 रुपये
* लातूर – 22 कॅरेट सोने : 54680 रुपये, 24 कॅरेट सोने : 59670 रुपये
* मुंबई – 22 कॅरेट सोने : 54650 रुपये, 24 कॅरेट सोने : 59620 रुपये
* नागपूर – 22 कॅरेट सोने : 54650 रुपये, 24 कॅरेट सोने : 59620 रुपये
* नाशिक – 22 कॅरेट सोने : 54680, 24 कॅरेट सोने : 59670 रुपये
* पुणे – 22 कॅरेट सोने : 54650 रुपये, 24 कॅरेट सोने : 59620 रुपये
* सोलापूर – 22 कॅरेट सोने : 54650 रुपये, 24 कॅरेट सोने : 59620 रुपये
* ठाणे – 22 कॅरेट सोने : 54650 रुपये, 24 कॅरेट सोने : 59620 रुपये
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेबद्दल बोलायचे झाले तर येथे सोने-चांदी सातत्याने स्वस्त होत आहे. कॉमेक्सवर सोन्याचा भाव 1950 डॉलर प्रति औंसच्या खाली घसरला आहे. याशिवाय चांदीचा भाव ही 22.65 डॉलर प्रति औंस आहे.
तुम्हीही बाजारात सोनं खरेदी करणार असाल तर हॉलमार्क पाहूनच सोनं खरेदी करा. सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी तुम्ही सरकारी ॲपचा ही वापर करू शकता. ‘बीआयएस केअर ॲप’च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता की ते खरे की नकली. याशिवाय या ॲपच्या माध्यमातूनही तुम्ही तक्रार करू शकता.
Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या.