ताज्या बातम्या
उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्या शिवसेना भवन येथे ध्वजारोहण, सर्व पदाधिकारी, शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित राहणार
देशाच्या 76 व्या स्वातंत्र्यदिनी दादर येथील शिवसेना भवनाच्या प्रांगणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाणार आहे. याप्रसंगी पक्षाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे हेसुद्धा उपस्थित राहणार आहेत.
15 ऑगस्ट हा स्वातंत्र्यदिन देशभरात मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. ठिकठिकाणी तिरंगा राष्ट्रध्वज फडकवून देशाप्रति आदर व्यक्त केला जातो. शिवसेनेनेही देशाभिमान सदैव जपला आहे. मंगळवार, 15 ऑगस्ट रोजी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेना भवन येथे ध्वजारोहण केले जाणार आहे.
या ध्वजारोहण सोहळय़ाला मुंबईतील सर्व नेते, उपनेते, विभागप्रमुख, लोकप्रतिनिधी, अन्य पदाधिकारी तसेच शिवसैनिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आल्याची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली.