केएल राहुल आणि श्रेयस अय्यर आशिया कपमध्ये खेळणार? ऋषभ पंतने शेअर केला फलंदाजी करतानाच

केएल राहुल आणि श्रेयस अय्यर आशिया कपमध्ये खेळणार? ऋषभ पंतने शेअर केला फलंदाजी करतानाच
यष्टीरक्षक फलंदाजाने केएल राहुल आणि श्रेयस अय्यरचा बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये फलंदाजी करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे.
इंडियन एक्स्प्रेसने आधीच वृत्त दिले आहे की केएल राहुल आणि श्रेयस अय्यर आशिया चषकासाठी टीम इंडियाच पुनरागमन करु शकले नाहीत, तर त्यांची विश्वचषकाच्या संघात सहभागी होण्याची शक्यता कमी आहे. टीम इंडिया आशिया चषक स्पर्धेत आपला विश्वचषक संघ उतरवण्याच्या तयारीत आहे. ३० ऑगस्टपासून ही स्पर्धा सुरू होत असल्याने राहुल आणि अय्यरचा फिटनेस हा संघ व्यवस्थापनासाठी चिंतेचा विषय आहे. त्यामुळे इतर पर्याय वापरुन पाहावे लागत आहेत. दोन्ही खेळाडूंनी पुनरागमन केले, तरी संघ व्यवस्थापनासाठी तो त्यांची निवड एक जुगारच ठरेल.
राहुल आणि अय्यर पुन्हा लय शोधू शकतील का?
रिषभ पंत इन्स्टाग्राम व्हिडीओ
राहुल आणि अय्यर पुन्हा लय शोधू शकतील का? मधल्या फळीतील फलंदाजी आणि यष्टीरक्षणाची जबाबदारी राहुल सांभाळू शकेल का? असे अनेक प्रश्न आहेत. जर राहुल आणि अय्यर आशिया कपला मुकले, तर भारतीय संघ परिस्थिती कशी हाताळतो, हे पाहणे मनोरंजक असेल. दोघांनीही तंदुरुस्ती मिळवून आशिया चषक स्पर्धेसाठी संघात स्थान मिळवले, तर हे भारतीय संघ व्यवस्थापन मधल्या फळीबाबतच्या डोकेदुखीतून वाचेल.
सामन्यानंतर रोमारियो शेफर्डने केला खुलासा
टीम इंडियासाठी मधल्या फळीची डोकेदुखी –
- केएल राहुल आणि श्रेयस अय्यर अनफिट असल्यामुळे टीम इंडियाला खूप अडचणींचा सामना करावा लागला. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत संघाने बरेच प्रयोग केले. मधल्या फळीबद्दल प्रश्न आहेत. सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन या खेळाडूंना चांगली कामगिरी करता आलेली नाही. दरम्यान, हार्दिक पांड्याही खराब फॉर्मशी झगडत आहे.