पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदर हीने प्रेग्नसीबाबत केला मोठा खुलासा, स्पष्टच सांगितलं की..
नवी दिल्ली : पाकिस्तानी सीमा हैदर सध्या पती सचिन मीणा याच्यासोबत ग्रेटर नोएडा येतील घरात राहत आहे. 13 मे रोजी अवैधरित्या भारतात येऊन वास्तव्य करत आहे. सीमा हैदर हिची चौकशी पूर्ण झाली असून तिला तिच्या चार मुलांसह पाकिस्तानात पाठवलं जाईल असं सांगण्यात येत आहे.
पण एका बातमींने खळबळ उडाली आहे. सीमा हिची तब्येत ढासळल्याने सचिन तिला रेग्युलर चेकअपसाठी घेऊन जात होता. त्यामुळे सीमा हैदर प्रेग्नंट असल्याचं सांगितलं जात आहे. इतकंच काय तर गरोदर असून पाच महिने झाल्याची चर्चा रंगली आहे.
काय म्हणाली सीमा हैदर?
सीमा हैदर हीनेच खुलासा केला आहे.हा व्यक्तिगत प्रश्न असून मीडियात याबाबत चर्चा करण्याची गरज नाही असं तिने सांगितलं. तसंच जेव्हा काही असेल तेव्हा सर्वांना कळेल असं तिन सांगितलं. सीमा हैदर गेल्या काही दिवसांपासून भारतीय नागरिकता मिळावी यासाठी प्रयत्नशील आहे. सचिनशी नेपाळमध्ये लग्न केलं असून धर्म परिवर्तन केल्याचं तिने सांगितलं आहे. त्यामुळे भारतीय नागरिकत्व मिळावं अशी मागणी करत आहे. दया आणि सामाजिक आधारावर सीमाला भारतीय नागरिकत्व मिळू शकते. पण जन्माच्या आधारावर सचिन मीणा आणि सीमा हैदर यांच्या मुलाला नागरिकत्व मिळू शकत नाही.
2004 नंतर माता पिता पैकी एक भारतीय असेल आणि दुसरा अवैधरित्या घुसखोरी करून आला असेल तर त्यांच्या मुलाला नागरिकता मिळणार नाही. 2004 पूर्वी असं नव्हतं. दुसरीकडे, सीमा हैदर आणि सचिन मीणा रविवारी घरावर तिरंगा फडकवताना दिसले. तिरंगा फडकवत सीमा हैदर हीने भारतात राहणार असल्याचा आपलं म्हणणं स्पष्ट केलं आहे.
दुसरीकडे,सीमाचे वकील एपी सिंह याने सांगितलं की, सीमाने कोणतीच फिल्म साईन केलेली नाही. भविष्यात अशी कोणतीच योजना नाही. फिल्म निर्माता अमित जानी यांनी सीमा हैदर हीची भेट घेतली होती. पण अमित जानी यांना आम्ही इथे पाठवलं नव्हतं. या चर्चेत अमित जानी यांनी फसवणूक करत व्हिडीओ बनवला होता. या व्हिडीओबाबत सीमाला काहीच माहित नाही. ती पाकिस्तानातून इथे चित्रपटात काम करण्यासाठी आली नाही. सीमा सचिनसोबत खूश असल्याचं त्यांनी सांगितलं.