मलिक कोणत्या गटात ? कारागृहातून बाहेर आल्यानंतर स्वतः शरद पवार करणार चर्चा
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना 17 महिन्यानंतर जामीन मिळाला आहे. अवघ्या दोन महिन्यांसाठी मलिक यांना जामीन देण्यात आला आहे. आरोग्याच्या कारणास्तव मलिक यांना जामीन देण्यात आला आहे.
कागदपत्रांची पूर्तता झाल्यामुळे आज मलिक तुरुंगाबाहेर येणार आहेत.
त्यामुळे मलिक अजितदादा गटात जाणार की शरद पवार गटात जाणार? मंत्रीपदी बसणार की राष्ट्रवादीचं काम करणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मलिक यांच्या आगामी भूमिकेबाबत सस्पेन्स कायम असतानाच आज शरद पवारांनी ते सुटल्यानंतर मी त्यांना भेटणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातील नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Thackeray vs Shinde : निवडणुकीपूर्वीच ठाकरे गटाला मोठा धक्का; मुंबईतील पदाधिकाऱ्यांचा थेट शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश!
काय म्हणालेत शरद पवार?
नवाब मलिक यांचा सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिला आहे. ते कारागृहात अजून बाहेर आलेले नाही. कदाचित आज ते कारागृहातून बाहेर येऊ शकतात. ते कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करण्यात येणार असल्याचे शरद पवार यांनी यावेळी सांगितले आहे.
NCP Crisis : राजकारणात बेरीज करायची असते, भागाकार-वजाबाकी होऊ नये म्हणून..; ‘साहेब-दादा’ भेटीवर काय म्हणाले जयंत पाटील?
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह ९ आमदारांनी शिवसेना-भाजपला पाठिंबा दिला आणि मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीत मोठी फुट पडली. त्यामध्ये शरद पवार गट आणि अजित पवार असे दोन गट निर्माण झाले. त्यानंतर पक्षातील एकुण आमदांरापैकी किती आमदारांनी अजित पवार गटाला आणि शरद पवार गटाला पाठिंबा दिला याबाबत स्पष्टता हळूहळू दिसू लागली आहे.
- PM मोदींचे आवाहन BCCIला पडले महागात! DP बदलताच झाले मोठे नुकसान, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
दरम्यान ज्या नेत्याने आणखी कोणालाही पाठिंबा दिला नाही त्यांनी आपली भुमिका स्पष्ट केल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून तुरूगांत असलेले राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री नवाब मलिक यांची भूमिका अद्याप स्पष्ट नसल्याने ते कोणाला पाठिंबा देणार याबाबतची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.