महाविकास आघाडीत एकी आहे, संभ्रम निर्माण करू नका – शरद पवार
टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार (Ajit Pawar) शरद पवारांची साथ सोडून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहे. अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादीचे दोन गट पडले.
मात्र, त्यानंतरही शरद पवार आणि अजित पवार यांच्या वारंवार भेटी होत राहिल्या. शनिवारी संध्याकाळी शरद पवार आणि अजित पवारांची भेट झाली होती.
त्यांच्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
There is unity in Mahavikas Aghadi – Sharad Pawar
अजित पवारांसोबत झालेल्या भेटीबद्दल बोलत असताना शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, “अजित पवार आणि माझ्यामध्ये झालेल्या भेटीचं कारण मी स्पष्टपणे सांगितलं आहे.
त्यामुळं याबाबत सतत प्रश्न विचारून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. महाविकास आघाडीमध्ये एकी आहे आणि ती कायम असणार. त्यामुळं कोणत्याही प्रकारचा संभ्रम निर्माण करू नका. आमच्या बैठकीबाबत मी हीच भूमिका स्पष्ट केली आहे.”
दरम्यान, शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार यांच्या भेटीनंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
“शरद पवारांना भाजपकडून दोन मोठ्या ऑफर्स आल्या आहे. यामध्ये भाजपने त्यांना केंद्रीय कृषिमंत्री पद आणि नीती आयोगाच्या अध्यक्षपदाची ऑफर दिली आहे.
मात्र, शरद पवारांनी या ऑफर नाकारल्या असल्याचं मला कळालं आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्यासह या बैठकीला जयंत पाटील देखील उपस्थित होते”, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं असल्याचं फ्री प्रेस जर्नल यांनी म्हटलं आहे.
Sanjay Raut | “राज्याचा कारभार सध्या वेड्यांच्या हातात.”; संजय राऊत यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका
Prithviraj Chavan | शरद पवारांना भाजपकडून मोठ्या ऑफर्स; पृथ्वीराज चव्हाण यांचा खळबळजनक खुलासा
Uddhav Thackeray | “.म्हणून शिंदेंची झोप उडाली”; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिदेंना टोला
Ajit Pawar | चांदणी चौक पुल लोकार्पणावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “केंद्र सरकारच्या सहकार्यामुळे.”
Aditya Thackeray | “अहंकाराने फुगलेल्या खोके सरकारमधल्या.”; आदित्य ठाकरेंची शिंदे गटावर खोचक टीका
Sharad Pawar | महाविकास आघाडीत एकी आहे, संभ्रम निर्माण करू नका – शरद पवार