निवृत्त खेळाडुचं वर्ल्ड कपमध्ये होणार पुनरागमन? कर्णधार स्वत: बोलणार
दिल्ली, 13 ऑगस्ट : वर्ल्ड कप २०२३ स्पर्धेचा काउंटडाऊन सुरू झाला आहे. सर्व संघ तयारीला लागले आहेत. भारतीय संघ ३० ऑगस्टपासून आशिया कप स्पर्धेत सहभागी होणार आहे. वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर तयारीच्या दृष्टीने ही स्पर्धा महत्त्वाची ठरणार आहे.
दरम्यान, इंग्लंडकडून १८ सदस्यांचा संघ जाहीर केला जाणार आहे. यामध्ये निवृत्ती घेतलेल्या खेळाडूची वर्णी लागण्याची शक्यता आहे. यासाठी इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर बेन स्टोक्सशी बोलणार आहे.इंग्लंडचे प्रशिक्षक मॅथ्यू यांनी डेली स्पोर्ट मेलशी बोलताना सांगितलं की, इंग्लंडचा वनडे संघाचा कर्णधार जोस बटलर हा बेन स्टोक्सशी पुनरागमनाबाबत बोलणार आहे. जोस बटलर त्याच्याकडून बेन स्टोक्सशी नक्की बोलले.
आम्हालाही हे बघायचंय की बेन स्टोक्सला यात किती रस आहे. आम्हाला माहिती नाही तो काय करेल पण आम्हाला आशा आहे.गेल्या काही काळापासून वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे संघातून बाहेर आहे. तो वर्ल्ड कप संघाचा भाग होऊ शकतो. आम्ही त्याच्या पुनरागमनासाठी प्लॅन करत आहे.
आम्ही त्याला सिद्ध करण्यासाठी संधी देत असल्याचंही प्रशिक्षकांनी सांगितलं.इंग्लंडचा संघ वर्ल्ड कपसाठी मंगळवारी जाहीर होणार आहे. यामध्ये १८ खेळाडूंचा समावेश असेल. या संघात कोणाची वर्णी लागेल हे पाहणं औत्सुक्याचं असेल. बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर हे पुनरागमन करणार की नाही याकडेसुद्धा क्रिकेटप्रेमींचं लक्ष असणार आहे.वर्ल्ड कपसाठी इंग्लंडचा संभाव्य संघ -जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, मोईन अली, सॅम करन, जोस बटलर, एलेक्स हेल्स ,बेन स्टोक्स, लियाम लिविंगस्टोन, आदिल रशीद, मार्क वुड, डेविड मालान, टाइमल मिल्स, हॅरी ब्रूक, रीसे टोपली, क्रिस वोक्स