इम्रान खानला मृत्यूची भीती
तोशखाना प्रकरणात तीन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर पंजाब प्रांतातील तुरुंगात शिक्षा भोगणारे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मृत्यूची भीती वाटत आहे.
दरम्यान, त्यांना शिक्षा झाल्याने आता पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ (पीटीआय)च्या अध्यक्षपदावरून त्यांची उचलबांगडी झाली आहे. इम्रान खान यांच्या वकिलांनी मागणी केल्यानंतर त्यांच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी डॉक्टरांचे एक पथक तैनात करण्यात आले आहे, जे दिवसरात्र त्यांची काळजी घेत आहे.
इम्रान खान यांच्या नशिबी जे तुरुंग आले आहे, त्यात अति धोकादायक कैद्यांना ठेवले जाते. अत्यंत खराब असलेल्या तुरुंगात इम्रान खान यांना सामान्य कैद्याप्रमाणे राहावे लागत आहे. पीटीआय पक्षाच्या नेत्यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे की, त्यांना ‘अ’ श्रेणीच्या तुरुंगात हलवण्यात यावे. तसेच आदियाला तुरुंगात स्थानांतरित केले जावे. Imran Khan इम्रान खान लहानपणापासूनच एका संपन्न कुटुंबातून येतात. आपले शिक्षण, सवयी आणि सामाजिक आणि राजकीय परिस्थितीमुळे त्यांना चांगल्या जीवनशैलीची सवय आहे. ते पाकिस्तानी कि’केट संघाचे कर्णधार होते. त्यांची सामाजिक, राजकीय परिस्थिती, शिक्षण आणि जीवनशैली पाहता, इम्रान खान पाकिस्तान तुरुंग नियमांच्या नियम क’मांक 248 आणि 243चा संदर्भ घेत ‘अ’ श्रेणीच्या सुविधांचे हकदार आहेत, असेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे.