ताज्या बातम्या
शोकांतीका ! शाळा सुटल्यानंतर 4 तास बस नाही..
गावाकडे जाणारी एसटी न आल्यामुळे चार तास अडकून
गावाकडे जाणारी एसटी न आल्यामुळे चार तास अडकून पडलेल्या विद्यार्थिनींनी एसटी प्रशासनाच्या भोंगळ कारभाराला वैतागून आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे.
औंध येथील शाळा सुटल्यानंतर रोज विद्यार्थी आणि विद्यार्थिनी एसटीने आपल्या गावी जातात मात्र संध्याकाळी एसटीच आली नाही.शाळा सुटल्यानंतर संध्याकाळी 5 वाजल्यापासून विद्यार्थी बसची वाट बघत होते, पण रात्री 9 वाजेपर्यंत बसच आली नाही, अखेर औंध शाळेतील विद्यार्थ्यांनी बस स्थानकाच्या दारात बसून धरणं आंदोलन केलं, यानंतर एसटी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली. तसंच उद्यापासून विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ देणार नाही, असं आश्वासन अधिकाऱ्यांनी दिलं. एसटीच्या या कारभारावर सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे.