भूमी अधिकार मोर्चाच्या संभाजीनगर येथील राज्यस्तरीय बैठकीस बहुसंख्येने उपस्थित राहावे – कडूदास कांबळे
भूमी अधिकार मोर्चाच्या संभाजीनगर येथील राज्यस्तरीय बैठकीस बहुसंख्येने उपस्थित राहावे कडूदास कांबळे
बीड : (सखाराम पोहिकर ) भूमी अधिकार मोर्च्याच्या महाराष्ट्र राज्य समन्वय समितीतील सर्व राज्यस्तरीय सदस्यांची येत्या 11 ऑगस्ट 2023 रोजी राज्य कार्यकारणीची बैठक मुंबई उच्च न्यायालयातील गायरान धारकाचे वकील डॉक्टर सुरेश माने साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संभाजीनगर येथे दुपारी दोन वाजता आयोजित करण्यात आली आहे या बैठकीसाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील भूमि अधिकार मोर्चाचे राज्य समन्वयक समितीतील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती भूमी अधिकार मोर्चाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक कडूदास कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली या बैठकीमध्ये खालील प्रमाणे विषयाची चर्चा करण्यात येईल दिनांक 19 जुलै 2023 रोजी मुंबई येथे गायरानधारकाचा आयोजित करण्यात आलेला मोर्चाचे यश अपयशाचे मूल्यमापन करणे महाराष्ट्र राज्य सामान्य समितीची दोन दिवसाची बैठक आयोजित करणे 2022 च्या सुमोटो याचिकेमध्ये सध्याचे गायरान जमिनीवरील शेतीचे आणि निवासाचे अतिक्रमण निष्कासित करण्याचे स्टेटस काय आहे त्या संदर्भात चर्चा करणे सरकारी गायरान जमिनीवरील अतिक्रमणा निष्कासित करण्यासाठी आलेल्या नोटिसांना कायदेशीर उत्तर देण्यासाठी कृती कार्यक्रम तयार करणे भूमी अधिकार मोर्चा महाराष्ट्र राज्य या संघटनेची तालुका जिल्हा महाराष्ट्र राज्य पातळीवर संघटनात्मक बांधणी करणे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ अशा चार परिषदाचे आयोजन करणे महाराष्ट्र राज्य पातळीवर गायनधारकांचा भव्य मेळाव्याचे आयोजन करणे बैठकीच्या अध्यक्षाच्या परवानगीने आणि वेळी येणाऱ्या विषयावर चर्चा करणे भूमी अधिकार मोर्चाच्या या महत्वपूर्ण नियोजन बैठकीसाठी समन्वयक समितीतील राज्यस्तरीय सर्व कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आव्हान कडू दास कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे