“शिवसेना, राष्ट्रवादी औरंग्याने फोडली” – उद्धव ठाकरे
शिवसेना ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेड यांच्यात संयुक्त बैठक आज पार पडली. राज्य आणि जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांची ही बैठक मुंबईच्या रंगशारदा सभागृहात आयोजित करण्यात आली होती.
बैठकीला उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी भाजपवर घणाघात केला. औरंगजेबाच्या मुद्द्यावरुन त्यांनी भाजपवर निशाणा साधला.
उद्धव ठाकरे म्हणाले, औरंगजेब आग्रासोडून महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्य संपवायला आला. त्याला ते तक्त दिसलं नाही त्याचं थडग महाराष्ट्राने बांधलं. छत्रपती शिवाजी महाराजांना संपवायला अफजल खान आला होता. त्याचं थडग प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधलं आहे. जे कोणी भगव्यावरती चाल करत आले त्याचे थडगे महाराष्ट्राने बांधले. हे महाराष्ट्रावर चाल करुन येणाऱ्यांनी लक्षात ठेवावे.
तुम्ही पाठीत वार करत असाल तर कोथळा बाहेरला काढावा लागेल, हे आम्हाला शिवरायांना शिकवले आहे. ही अफजल खानाची स्वारी आहे. महाराजांचे नातलग देखील त्यात सहभागी झाले होते. ED, CBI, Iccome Tax, हे अफजलखानाचे दूत आहेत. खंडोजी खोपडे सरकार अफजलखानासोबत सामील झाले होते. असं रोज थोड मी पण ऐकतोय, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
उद्धव ठाकरे म्हणाले, “औरंगजेब, अरे कोण औरंग्या? कोणाचे आहे. तुमच डबल इंजिन बसलं तर शोधा औरंग्याची औलाद. एवढही तुम्हाला माहित नाही. औरंग्याची औलाद महाराष्ट्रात आम्ही खपवून घेणार नाही. मी मुख्यमंत्री असताना का दंगल घडली नाही. तेव्हा औरंग्याची औलाद पळून गेली होती. अमित शहा गृहमंत्री आहेत त्यांना विचारा.”
आज सुद्धा औरंगजेब जिवंत-
“आज सुद्धा औरंगजेब जिवंत आहे. कारण जो काही इतिहास आहे. त्यात औरंगजेब बोलला आहे की या मराठी पहाडी मुलखात मराठे तमाम दुनियेला भारी आहेत. इथं पराक्रम शिकवावा लागत नाही. इथं तर गवताला देखील भाल्याची पाथे फुटतात. परंतू दुहीजे बिजे खडकावर जरी भिरकवले तरी ती एवढी रुजतात आणि फोफावतात की म्हणता-म्हणता तमाम दौलत तबाह करुन टाकतात. (latest marathi news)
मग औरंगजेब जिवंत आहे की नाही?. शिवसेना, राष्ट्रवादी फोडणारा औरंगजेब जिवंत आहे की नाही?. ही औरंग्याची वृत्ती फडणवीससाहेब तुमच्या पक्षात आहे, महाराष्ट्रात नाही. हे मराठ्यांचे राज्य आहे. हे फोडण्याचे काम तुमच्या औरंगजेबी वृत्तीने केले आहे. औरंगजेब तुमच्यात दडला आहे. हा औरंगजेबाच्या घराणेशाहीच्या इतिहास आहे,” असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.