आयकर भरणाऱ्यांना मोठा झटका, मिळणार नाही रिफंडचे पैसे!
आयकर भरणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. तुम्ही जर तुमचा इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरला असेल आणि आता रिफंडची वाट पाहत असाल तर ही बातमी तुमची निराशा करेल. या वेळी पैसे परत केले जाणार नाहीत, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.
आयकर रिटर्न (ITR) भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 होती, पण तरीही ज्यांनी ITR भरला नाही त्यांना 5000 रुपये दंड भरावा लागेल.
परतावा मिळणार नाही
प्राप्तिकर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जर तुम्ही रिफंड फाइल केला असेल आणि तुम्हाला अद्याप रिफंडचे पैसे मिळाले नाहीत, तर असे होऊ शकते की तुमचे रिफंडचे पैसे सरकारने रोखले आहेत.
पैसे परत का मिळणार नाहीत?
सरकारने 2022-23 या आर्थिक वर्षासाठी आयकर रिटर्न भरणाऱ्यांना रिफंडचे पैसे देण्यास सुरुवात केली आहे, परंतु यावेळी सरकारने सांगितले आहे की, ज्यांनी व्हेरिफिकेशन केले आहे, त्यांनाच रिफंडचे पैसे मिळतील. जर तुम्ही आयटीआर व्हेरिफिकेशन केले नसेल, तर यावेळी तुम्हाला सरकारकडून पैसे परत मिळणार नाहीत.
30 दिवसांचा कालावधी उपलब्ध आहे
सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार, तुम्हाला ITR दाखल केल्यानंतर 30 दिवसांच्या आत ई-व्हेरिफिकेशन करावे लागेल. पूर्वी हा कालावधी 120 दिवसांचा असायचा, परंतु आयकर विभागाने आता तो 30 दिवसांवर आणला आहे, जो 1 ऑगस्ट 2022 पासून लागू होणार आहे.
आयकर विभागाने ही माहिती दिली
या कालावधीत तुम्ही तुमच्या रिटर्नची पडताळणी न केल्यास, तुमचे रिफंडचे पैसे अडकतील. यासोबतच तुमच्या आयटीआरवरही प्रोसेस केली जाणार नाही. आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार, आयटीआर सत्यापित करणाऱ्यांनाच टॅक्स रिफंड दिला जातो.