बीडमहाराष्ट्रराजकीय

बीड संभाजी भिडेच्या तोंडाला काळे फासणार्यांना एक लाखाचे बक्षीस..


बीड : राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विरोधात जाणीवपूर्वक गरळ ओकणाच्या संभाजी भिडेच्या वक्तव्याचा बीड काँग्रेसच्या व तीने तिव्र निषेध व्यक्त करत घोषणाबाजी करण्यात आली.

जो कोणी संभाजी भिडेला काळे फासेल त्याला बीड काँग्रेसच्या वतीने एक लाखाचे बक्षिस दिले जाईल अशी घोषणा आय काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी केली. बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसच्या वतीने तिव्र दिनर्शन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्य देशमुख हे माध्यमांना बोलत होते.

बीड जिल्हा काँग्रेसच्या वतीने मंगळवार दि. 1 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कर्यालयासमोर तिव्र निदर्शने करत संभाजी भिडे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माध्यमांना बोलतांना म्हणाले की, भारतीय स्वतंत्र लढ्यातील थोर स्वतंत्रसेनानी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे वडील हे एक मुस्लिम जमीनदार होते व त्यांच्या शिक्षणाचा खर्च देखील मुसलमानांनी केला असा अतिशय चुकीचे व अवमानकारक वक्तव्य करून देशवासीयांच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न संभाजी भिडे यांच्या कडून झालेला आहे. त्याच बरोबर पंडित जवाहरलाल नेहरू याचे भारताच्या स्वतंत्र लढ्यात कवडीचे ही योगदान नाही, महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल देखील इंग्रजांनी बहाल केलेल्या गांडू भडव्यांच्या यादितील समाजसुधारक म्हणून उल्लेख केलेला आहे. लाखो भाविकांची श्रद्धा असलेले शिडीचे साईबाबा यांना देखील घरातून बाहेर फेका म्हणत लाखो भाविकांच्या भावना दुखावल्या. संभाजी उर्फ मनोहर भिडे हे विकृत मनोवृत्तीचे असून यापूर्वी देखील जाणीवपूर्वक चुकीचे विधान करून देशवासीयांच्या भावना दुखावन्याचे काम त्यांनी केलेले आहे. 15 ऑगस्ट रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाले असून देशभरात मोठा उत्साह साजरा होत असताना भिडे मात्र 15 ऑगस्ट काळा दिवस आहे त्यादिवशी फाळणी झाली होती असे म्हणून देशवासीयांच्या भावना दुखावण्याचे काम करतात. एका महिला पत्रकाराला भर माणसात डोक्याला टिकली लावुन ये नंतर मला बोल असे म्हणून महिलांचा अपमान करतात. माझ्या कडील आंबा खाल्यास मुल होईल अशी अनेक चुकीचे विधाने करत जाणीवपूर्वक समाजाच्या भावना दुखावणे किंवा जातीय दंगली घडवण्याचे काम वारंवार भिडे यांच्या कडून होत आहेत. परंतु दुर्दैवाची बाब म्हणजे त्यांच्यावर कसल्याही प्रकारची कारवाई होत नाही. त्यांना पाठीशी घालत अशा विकृत मानसिकतेला पाठीशी घालण्याचे काम भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये बसलेल्या काही मंडळींकडून होत आहे. काँग्रेस पक्ष हा महापुरुषांच्या विचारावर चालणारा व देशवासीयांच्या विकासासाठी लढणारा पक्ष असून कुठल्याही महापुरुषांचा अवमान आम्ही सहन करणार नाहीत. यासर्व प्रकरणाचा बीड जिल्हा काँग्रेस कमिटी कडून तीव्र निषेध करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करुन त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणीही यावेळी जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी केली. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, उपाध्यक्ष राहुल भैया सोनवणे, नवनाथराव थोटे, केजचे माजी नगराध्यक्ष पशुपतिनाथ दांगट, जिल्हा सरचिटणीस प्रवीणकुमार शेप, जिल्हा सरचिटणीस भास्कर केदार, समीर देशपांडे, बीड तालुका अध्यक्ष गणेश बजगुडे पाटील, शिरूर तालुका अध्यक्ष रमेश सानप, परळी तालुकाध्यक्ष अनिल जाधव, केज तालुका अध्यक्ष प्रवीण खोडसे, पाटोदा तालुकाध्यक्ष राहुल जाधव, गेवराई तालुका अध्यक्ष महेश बेदरे, वडवणी तालुकाध्यक्ष ज्ञानदेव आंधळे, बीड शहराध्यक्ष परवेझ कुरेशी, शिरूर शहराध्यक्ष असेफ शेख, युवक प्रदेश सरचिटणीस शंभुराजे देशमुख, युवा नेते अशोक देशमुख, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्रीनिवास बेदरे, ओबीसी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संभाजी जाधव, निराधार निरक्षित जिल्हाध्यक्ष शेख मोहसीन, किसन काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमोल पाठक, रोजगार स्वंरोजगार जिल्हाध्यक्ष विष्णु मस्के, युवक काँग्रेस बीड विधानसभा अध्यक्ष हनुमान घोडके, युवक काँग्रेस शिरूर तालुकाध्यक्ष अशोक केदार, माजलगाव विधानसभा अध्यक्ष विजय पवार, बीड तालुका सचिव शेख अर्शद, शेख अरबाज, ओबीसी बीड शहराध्यक्ष सय्यद फरहान, राम शेळके, शेख सिराज पटेल, बाळासाहेब जगताप, समध कुरेशी, मुक्तार बागवान, बाबासाहेब झोडगे, शेख जाहीर, शेख अमीर, शेख नाजेद, शेख रफिक, शेख इस्माईल, पवन अडगळे, बाळू अडगले आदी पदाधिकारी उपस्थित होते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button