विवाहित महिलेने प्रियकरासा व्हॉट्सअॅपवर एक फोटो पाठवला त्यावर प्रियकराकडून असा काही रिप्लाय आली की महिलेने विष पिऊन आयुष्य संपवले आहे. मध्य प्रदेशातील ग्वालियारमध्ये ही घटना घडली आहे.
या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर, महिलेने घेतलेल्या टोकाच्या निर्णयामुळं कुटुंबीयांना एकच धक्का बसला आहे. पूनम असं या महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुनमचे वय २२ वर्ष इतके होते. ती मोहनगढ या गावात राहत होती. दोन दिवसांपूर्वी तिने विष पित आत्महत्या केली आहे. या घटनेचे कारण ऐकून पोलिसही चक्रावले आहेत. आत्महत्येचे कारण शोधून काढण्यासाठी पोलिसांनी महिलेच्या कुटुंबीयांकडे तसेच बाहेरही चौकशी केली. त्यावेळेस अनेक गोष्टींचा खुलासा झाला आहे. तसंच, महिलेच्या फोनमधूनही अनेक गोष्टी उघड झाल्या आहेत.
पुनमचे काही वर्षांपूर्वी पहिले लग्न झाले होते. मात्र, नवऱ्यासोबत न पटल्याने ती तिच्या माहेरी परत आली होती. तसंच, दोघांचा घटस्फोटदेखील झाला होता. पहिल्या लग्नानंतर तिने दुसरे लग्नही केले होते. मात्र, ते लग्नही फार काळ टिकले नव्हते. लग्नानंतर ती दहा दिवसांतच तिच्या गावी परत आली होती. खरंतर महिलेच्या गावातीच एका मुलासोबत कित्येत वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोन्ही लग्न तुटल्यानंतर ती गावातच स्थायिक झाली होती.
गावात पुन्हा परतल्यानंतर तिने तिच्या प्रियकराला याबाबत माहिती दिली. दोघांमध्ये सतत बोलणंही होत होते. एक दिवस त्यांच्यात एका क्षुल्लक कारणावरुन वाद झाला होता. या भांडणातून महिलेने तिच्या प्रियकराला ती जीव देणार असल्याचं म्हटलं. तसंच. पुरावा म्हणून तिने तिच्या हातात असलेल्या विषाच्या बॉटलचा फोटोही पाठवला होता.
महिलेने व्हॉट्सअॅपवर प्रियकराला विषाच्या बॉटलचा फोटो पाठवला होता. त्यावर त्याने फक्त ओके असा रिप्लाय दिला होता. प्रियकराचा रिप्लाय पाहून महिला नैराश्यात गेली होती. त्यानंतर लगेचच तिने तेच विष पिऊन आत्महत्या केली आहे. महिलेला निपचित पडलेले पाहून तिच्या कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, मृत्युपूर्वी तरुणीने पोलिसांना जबाब दिला होता. त्यावर तिने तरुणावर आरोप केले आहेत. तरुण त्रास देत असल्याचं तिने जबाबात म्हटलं आहे.