महाराष्ट्राचा कांदा रेल्वेद्वारे पोहोचला ह्या राज्यात
देशाच्या कानाकोपऱ्यात रेल्वेद्वारे माल वाहतूक केली जाते. यामध्ये दूध, पाणी, इंधन, खते, सिमेंट, दगडी कोळसा, धान्य, निर्यात केला जाणारा माल आणि इतर गोष्टींच्या वाहतुकीसाठी रेल्वेचा वापर केला जातो.
त्यातच आता भारतीय रेल्वेने महाराष्ट्रातील अंकाई मालधक्का (मनमाड) येथून खोंसोंग मणिपूर येथे मालगाडीतून कांदा पाठवला आहे. २८०१ किमीचे अंतर कापत २४ जुलै रोजी दुपारी ४ वाजता मालगाडी खोंगसोंग येथे पोहोचली.
मोठ्या प्रमाणावर माल वाहतुकीसाठी भारतीय रेल्वेचा वापर केला जातो. त्यातच महाराष्ट्रातून मणिपूर येथे कांदा रेल्वेने पाठवण्यात आला आहे. भारतीय रेल्वे विभागाने आपल्या ट्विटर हँडलवरून याबद्दल माहिती दिली आहे.
दरम्यान, मणिपूर येथे मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू आहे, तर महिलांवरही अत्याचार झाल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे देशभरात मणिपूर सध्या चांगलेच चर्चेत आले. त्यातच महाराष्ट्रातला कांदा आता मणिपूरमध्ये पोहोचला आहे. राज्यात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले असल्याने व्यापाराच्या दृष्टीने ही वाहतूक करण्यात आल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.